Blue Star AC cheating case
Blue Star AC cheating case : चंद्रपूर : एसी बसविण्याच्या नावाखाली ब्ल्यूस्टार कंपनीच्या मुंबई विभाग प्रतिनिधीसह नागपूर व चंद्रपुरातील एंजटने चंद्रपुरातील एका डॉक्टरची तब्बल ३५ लाख २१ हजार २७३ रुपयांनी फसवणूक केली. याप्रकरणी डॉक्टरच्या तक्रारीवरुन शहर पोलिस स्टेशनमध्ये अभिलाश शाहा, कार्तिकेयन, गुरुनानक रेफ्रिजेशनचे डिलरचे मालक गगनदीप सैनी, जसबीर सिंग सैनी या चौघांवर बीएनएस ३१८ (४), ३ (५) या कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे. नामांकित असणाऱ्या ब्ल्यूस्टार कंपनीच्या प्रतिनिधीकडून झालेल्या या प्रकारामुळे विश्वास ठेवायचा कसा, असा प्रश्न उद्भवत आहे. AC installation fraud Chandrapur
चंद्रपुरातील दुचाकी प्रकरणात ट्विस्ट, फिर्यादीने शोधला आरोपी
चंद्रपुरातील एका हृदयरोग तज्ज्ञाचे पडोलीत नव्या रुग्णालयाच्या ब्लिडिंगचे सुसज्ज असे बांधकाम सुरु आहे. २ जानेवारी २०२३ रोजी ब्ल्यूस्टार कंपनीची एसी रुग्णालयात बसवावी, असा प्रस्ताव घेऊन ब्ल्यूस्टार कंपनीचे मुंबई विदर्भ विभागाचे प्रतिनिधी अभिलाश शाहा, कार्तिकेयन, गगनदीप सैनी हे गंजवॉर्ड येथील त्या डॉक्टरच्या रुग्णालयात गेले. Doctor scammed AC installation
ओव्हरटेक करण्याच्या नादात भीषण अपघात, महिलेचा मृत्यू तर 2 जखमी
त्यांनी ब्ल्यूस्टार कंपनीची एसी चांगली असल्याचे सांगतिले. त्यांनी कंपनीकडून घेतलेल्या कोटेशनच्या आधारे गुरुनानक रेर्फिरेटर प्रा. लि. चंद्रपूरच्या खात्यावर २५ डिसेंबर २०२३ रोजी ३५ लाख २१ हजार २७३ रुपयांची रक्कम वढती केली. मात्र रक्कम वढती झाल्यानंतर ब्ल्यूस्टार कंपनीचे मुंबई प्रतिनिधी अभिलाश शाहा, कार्तिकेयन गगनदीप सैनी, जसबीर सैनी यांनी लवकरच काम सुरु करु असे आश्वासन दिले.
थातूरमातूर काम केल्यानंतर काम बंद केले. तेव्हापासून हे सर्वचजण काम करण्यास असमर्थता दर्शवत आहेत. तसेच पैसेही परत देण्यास नकार देत आहेत. अशी तक्रार त्या डॉक्टरांनी शहर पोलिसांत दिली आहे. त्याआधारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. AC installation fraud Maharashtra
अर्धवट कामानंतर झाले पसार
त्या डॉक्टरनी ब्ल्यूस्टार कंपनी डिलरच्या खात्यात पैसे वर्ग केल्यानंतर साईटवर काम सुरु केले. वायरिंग व कॉपर पाईपकींचे थोडेफार काम केल्यानंतर काम बंद केले. डॉक्टरांनी विचारणा केली असता, आज उद्या करुन असे सांगून वेळ मारुन नेली. मात्र आता एक वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला असतानाही कामाला सुरुवात केली नाही.
कंपनी म्हणते पुन्हा पैसे टाका
चंद्रपूर येथील ब्ल्यूस्टार कंपनीचे डिलर तथा गुरुनानक रेफ्रिजेशनचे मालक हे पैसे देऊनही काम करत नसल्याची माहिती ब्ल्यूस्टारच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यांनी आज उद्या काम करतील असे आश्वासन दिले. त्यानंतर प्रतिसादच देणे बंद केले. मात्र डॉक्टरांकडून दररोज संपर्क करणे सुरु असताना कंपनीचे अधिकारी आता तुम्ही थेट कंपनीकडे पैसे टाका, तेव्हा काम सुरु करु असे सांगत असल्याचा आरोपही डॉक्टरांनी केला आहे.
माझ्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे – जसबीर सिंग सैनी
डॉक्टरांनी केलेल्या आरोपावर जसबीर सिंग यांनी आपली बाजू मांडली आहे, सदर प्रकरणात माझा काही सहभाग नाही, जे पैसे खात्यात वळविण्यात आले ते खाते माझे नाही, पोलिसांनी या प्रकरणात योग्य तपास केल्यास त्यांना सत्य माहिती कळेल. मी मागील 40 वर्षांपासून चंद्रपुरात एसी चा व्यवसाय करतो, या कालावधीत आम्ही ग्राहकांना चांगले कामे करून दिली आहे, त्यामुळे आमच्या कामापासून ग्राहक खुश आहे.
Fake Complaint by Cheap doctor , Doctors like this show themself as God and are the actual fraudster. Doctor asking for the things even for which he hasn’t paid.
Patients should avoid such fraud doctors who puts fake complaints.