Car bike accident case
Car bike accident case : चिमूर – पळसगाव (पिपरडा) विहीरगाव वरून चिमूर कडे भरधाव वेगात ओव्हरटेक करणाऱ्या चारचाकी वाहनाने दुचाकीला जबर धडक दिल्याने एक ठार महिला ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक ३०/०३/२०२५ सायंकाळी ५.३० सुमारास घडली. Drunk driving accident case
दुचाकी चोरीचा पोलिसांनी नाहीतर फिर्यादीने केला तपास
पिपर्डा येथील भारत भेंडारे यांच्या घराचे वास्तूपूजन करून पती-पत्नी आपल्या मुलाला घेऊन आपल्या स्वगावी पवनी जिल्हा भंडारा कडे जात असतानाच विहीरगाव कडून दवाखान्यात जात असलेल्या भरधाव चारचाकी वाहनाने मागून धडक दिल्याने दुचाकीवरील महिला रिया राकेश जुमडे (३७, रा. पवनी )हिचा मृत्यू झाला.
चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्या महिलेला मृत घोषित केले आहे. तर त्याचे पती राकेश ताराचंद जुमडे (वय ३७)लहान मुलगा अद्वित राकेश जुमडे (४) हे जखमी आहेत.
एमएच ३३ – एफ ५१५१ या क्रमांकाच्या चार चाकी वाहनाने समोर जाणाऱ्या दुचाकीला (क्र. एमएच ३६ – व्ही ५००१) जोरदार धडक दिल्याने महिला ठार झाली. तर या अपघातात तिचा पती राकेश ताराचंद जुमडे (वय ३७) लहान मुलगा अद्वित राकेश जुमडे (४) हा सुद्धा अपघातात जखमी झाला. हा अपघात रविवारला सायंकाळी साडे पाच च्या सुमारास घडला.

दुचाकीला धडक देणारी चारचाकी ही विहीरगाव येथील मंगेश नन्नावरे यांची असल्याची माहिती मिळाली असून चालक विना लायसन्स व मद्यप्राशन करून गावातूनच भरधाव वाहन चालवीत जात असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.