CBSE 10th exam । CBSE च्या नवीन परीक्षा पद्धतीला खासदार धानोरकरांचा विरोध!

CBSE 10th exam

CBSE 10th exam : केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाने 2026 पासून 10वी च्या परीक्षांमध्ये अमुलाग्र बदल करण्यासाठी मसुदा तयार करुन नविन नियमांना मंजुरी दिली आहे. नविन नियमाअंतर्गत 10वी बोर्डाची परीक्षा दोन वेळा घेण्यात येणार असल्याने खासदार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar MP) यांनी नविन मसुदा नियमांना विरोध दर्शवित त्या आशयाचे पत्र केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळाच्या अध्यक्षांना पाठविले आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाच्या नविन नियमानुसार विद्यार्थ्यांना दोन वेळा परीक्षा द्यावी लागणार असल्याने व माध्यमिक शिक्षा मंडळाने बदलविलेल्या मसुदा नियमांच्या अनुषंगाने खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या कडे अनेक विद्यार्थी व पालकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यानुसार खासदार धानोरकर यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळाच्या अध्यक्षांना पत्र लिहित आक्षेप नोंदविलेला आहे.

या पत्रामध्ये त्यांनी सदर परीक्षा पध्दतीतून दोष निर्माण होणार असल्याचे सांगितले. तसेच, मे महिन्यातील तापमानामुळे विदर्भात सदर परीक्षा विद्यार्थ्यांसाठी जिवघेणी ठरणार असल्याचे सांगितले. तसेच, या पत्रातून शाळांना अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होणार असून शालेय वेळापत्रक देखील कोलमडणार आहे व शिक्षकांना सदर परीक्षापद्धती अडचणीची ठरणार आहे. त्यामुळे सध्याची प्रचलीत परीक्षापध्दती योग्य असून हिच परीक्षा पध्दत कायम ठेवण्याची आग्रही भुमीका खासदार धानोरकर यांनी घेतली आहे. CBSE exam pattern change

चंद्रपुरात परीक्षा केंद्रावर धाड, कॉपी चा ढीग आणि शिक्षकांची मदत

या संदर्भात केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळाने मागविलेल्या हरकती वर खासदार धानोरकरांनी पत्रातून आक्षेप नोंदविला आहे. या संदर्भात खासदर धानोरकर यांनी केंद्रीय शिक्षा मंत्री यांची भेट घेणार आहेत. बोर्डाने कुठलाही निर्णय घेण्याआधी विद्यार्थी, शिक्षक व शालेय प्रशासक यांचा देखील विचार करावा असे देखील खासदार धानोरकर यांनी पत्रातून सांगितले.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!