Chandrapur Babupeth ward problems । बाबूपेठ प्रभाग: समस्यांचा डोंगर, पालिकेची डोळेझाक

Chandrapur Babupeth ward problems

बाबूपेठ प्रभागात पालिकेची निष्क्रियता: नागरिकांचा संताप वाढला

Chandrapur Babupeth ward problems : चंद्रपूर शहरातील बाबूपेठ प्रभाग हे समस्यांचे माहेरघर आहे, महानगर पालिकेला कित्येकदा निवेदनाद्वारे बाबूपेठ प्रभागातील समस्या निदर्शनास आणून देण्यात आल्या, मात्र पालिका प्रशासन समस्याकडे डोळेझाक करण्याचे काम करीत आहे,त्यामुळे बाबूपेठ मधील नागरिकांनी महानगर पालिकेच्या आयुक्तांची भेट घेऊन बाबूपेठ प्रभागातील समस्यांचा पाढाच वाचला. Babupeth Chandrapur municipal corporation complaints

गुन्हेगारीचा थरार – चंद्रपुरात युवकाची हत्या

या समस्येत प्रामुख्याने बजरंग क्रीडा संकुल ला लागून असलेले माराई मंदिर परिसर, गोंड पुरातन मंदिर परिसरात सर्वत्र घाण पसरलेली आहे,त्याच परिसरात विहिरीची दैनावस्था, तसेच विहिरीला कठडे नसल्याने लहान मुलांना धोका निर्माण झाला आहे,अमृत योजनेचे पाईप लाइन टाकण्याकरिता संपूर्ण रस्ते फोडलेले आहे,आणि नळाला पुरेसे पाणी सुद्धा येत नाही. Chandrapur municipal negligence Babupeth

रेल्वे उडान पुलाच्या खाली फुले चौक येथील रस्त्याचे अर्धवट काम केले आहे,दररोज अपघात होत असतो, मोकाट कुत्र्यामूळे लहान मोठयाना धोका निर्माण झालेला आहे.तसेच इतर समस्यांमुळे बाबूपेठ प्रभागातील नागरिक हैराण झालेले आहे,त्यामुळे वरील मूलभूत समस्या तात्काळ सोडवून बाबूपेठ प्रभागातील नागरिकाना न्याय द्यावा अशी आग्रही भूमिका घेऊन महानगर पालिका आयुक्त बिपीन पालिवाल यांना सामाजिक कार्यकर्ते चंदाताई वैरागडे, मुकेशभाऊ गाडगे, महेशभाऊ म्याकलवार, ज्ञानेश्वर नगराळे,उमंग हिवरे यांच्या नेतृत्वात निवेदन सादर केले.यावेळी संगीता देठे, वैशाली ऐसेकर, नीता चन्ने, कांचन बेरड, दामू मरस्कोल्हे, बाबू दंतुलवार,निखिल खनके उपस्थित होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!