Chandrapur CDCC bank SIT inquiry
Chandrapur CDCC bank SIT inquiry : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील भ्रष्टाचाराची एसआयटी चौकशी करण्यात येणार आहे. सोमवारी (२५ मार्च) विधासभेत राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या लक्षवेधीवर गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी माहिती दिली.
लक्षवेधीच्या माध्यमातून आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला. यापूर्वी सदर भ्रष्टाचार प्रकरणाबाबत आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीसोबत राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली होती. bank employee recruitment scams
चंद्रपूर जिल्ह्यातील क्रिकेट बुकींची पळवाट, धंदा मात्र कायम
लक्षवेधी मांडताना आज आमदार श्री. मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत भ्रष्टाचार इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे की त्याची कल्पनाही न केलेली बरी. ग्राहकांच्या खात्यातून पैसे गायब होतात. नोकरभरतीमध्ये पैसे खाल्ले जातात. आरक्षण हद्दपार केले जाते. तरीही कारवाई होत नाही. customer account hacking recovery
१७ मार्च २०२५ ला सुप्रीम कोर्टानेने जो निकाल दिला, त्यानुसार ज्या खातेधारकांची चूक नसताना पैसे काढले जात असतील तर त्यावेळी बॅंकेने त्वरीत त्यांचे पैसे भरून द्यायचे असतात. यामध्ये पैसे खाता आले नाही, म्हणून फायर वॉल करण्यात आली नाही. सर्वस्वी चूक ही बॅंकेचे भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी व संचालकांची आहे. भ्रष्टाचार किती खालपर्यंत पोहोचला आहे, याची कल्पना यावरून यावी की, यांचे रक्त जर पॅथॉलॉजीमध्ये तपासायला गेले तर रक्ताच्या थेंबातून हिमोग्लोबीन सापडणार नाही. तर फक्त भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारच सापडेल, असे आ.सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
मालमत्ता कराची कर चुकवेगिरी करणाऱ्यांचे नावे चंद्रपूर मनपाने केले जाहीर
पुढे म्हणाले, आज संविधानावर आपण चर्चा करणार आहोत. संविधानाने, न्यायालयाने आणि शासनानेही सांगितले आहे की आरक्षण असले पाहिजे. पण चंद्रपूर जिल्हा बॅंकेमध्ये आरक्षण धुडकावून लावण्याचा महाप्रताप संचालक मंडळाने केला आहे. दिव्यांग, महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींचे आरक्षण असले पाहिजे. पण यांपैकी कुणालाही आरक्षण दिले गेले नाही. जी नोकरभरती केली, त्यामध्ये आर्थिक व्यवहार झाला अशी माहिती मिळाली. परीक्षा केंद्रावर गोंधळ घातला. पैसे खाऊन नोकरभरती केल्यामुळे काही संघटनांनी उपोषण केले. त्यानंतरही भ्रष्ट लोकांना पाझर फुटला नाही. या प्रकरणात एसआयटीची चौकशी लावणार का, असा प्रश्न आमदार मुनगंटीवार यांनी केला. district cooperative bank corruption
एसआयटी लावताना त्याची कार्यकक्षा ठरवली गेली पाहिजे. यामध्ये आमच्या सर्व सदस्यांसोबत चर्चा झाली पाहिजे. तेव्हा कुठे ‘दूध का दूध, पानी का पानी’, होईल.ही चौकशी लावताना मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने लावा, असेही आ . मुनगंटीवार म्हणाले. customer fund transfer fraud
गृहराज्यमंत्री म्हणाले एसआयटी लावणार
आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रश्नांना उत्तर देताना गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे खाते हॅक करून ३३ ग्राहकांचे ३ कोटी ७० लाख ६४ हजार रुपये एका अज्ञान व्यक्तीने हरियाणाच्या खात्यात वळते केले. यासाठी आणि नोकरभरतीत झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी एसआयटी लावण्यात येईल. आमदार मुनगंटीवार यांच्या सुचनेप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने ही चौकशी लावण्यात येईल.
Right decision Sudheer Bhau mungantiwar