Chandrapur forest academy corruption probe
Chandrapur forest academy corruption probe : चंद्रपूर: येथील वन अकादमीतील सरकारी निधीतून खरेदी केलेल्या लाखो रुपयांच्या उपकरणांची नासाडी झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आम आदमी पक्षाने (आप) मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रेड्डी यांनी हा भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न केला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी ‘आप’ने केली आहे.
शिवद्रोही प्रशांत कोरटकर ला सहकार्य करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा
‘आप’चे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, युवा जिल्हाध्यक्ष राजू कूडे, महानगर संघटन मंत्री संतोष बोपचे आणि युवा संघटन मंत्री मनीष राऊत यांनी मुख्य वनसंरक्षक रेड्डी यांना याबाबत तक्रार अर्ज दिला आहे. वन अकादमीतील सरकारी क्वार्टर्समध्ये निष्काळजीपणे टाकून दिलेल्या लाखो रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणे, औषध किट्स आणि इतर साहित्याची तत्काळ चौकशी करावी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. Srinivas Reddy forest officer allegations
वन अकादमीतील एका बंद खोलीत सापडलेल्या साहित्यात स्नेक बाईट उपचार किट्स, प्रथमोपचार किट्स, हार्ड डिस्क, माईक्स, कॅटरेज आणि इतर महत्त्वाच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे अनेक बॉक्स होते. ही सर्व उत्पादने नवीन पॅकिंगमध्ये असूनही त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ लागल्यामुळे त्यांची नासाडी झाली आहे. सरकारी निधीतून खरेदी केलेली ही लाखो रुपयांची उत्पादने अशा स्थितीत सापडणे हे निष्काळजीपणाचे आणि भ्रष्टाचाराचे जिवंत उदाहरण आहे, असा आरोप ‘आप’ने केला आहे. Maharashtra forest equipment wastage case
या प्रकरणी घटनास्थळी जाण्यास रेड्डी यांनी नकार दिल्याने ‘आप’चे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार आणि रेड्डी यांच्यात जोरदार वाद झाला. राईकवार यांनी या भ्रष्टाचाराची जबाबदारी स्वीकारून तात्काळ चौकशी करण्याची मागणी केली, मात्र रेड्डी यांनी उडवाउडवीची उत्तरे देत प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. वाद वाढल्याने रेड्डी यांनी पोलिसांना पाचारण करून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी आल्यावरही ‘आप’च्या पदाधिकाऱ्यांनी ठाम भूमिका घेत घटनास्थळी पंचनामा करून संपूर्ण चौकशीची मागणी केली.

राईकवार यांनी रेड्डी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी रेड्डी यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. याच प्रकरणात त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते आणि नंतर त्यांना निलंबितही करण्यात आले होते. अमरावतीतील भाजप नेत्यांनीही रेड्डी यांच्याविरोधात सबळ पुरावे असल्याचे आयपीएस अधिकाऱ्यांसमोर मांडले होते. Forest academy government funds misuse
चंद्रपूर जिल्ह्यात अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांची नियुक्ती करून प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराची उधळी लावली आहे, असा आरोप राईकवार यांनी केला आहे. रेड्डी यांच्या अमरावतीतील कार्यकाळात झालेल्या गंभीर भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर त्यांना पुन्हा चंद्रपूरमध्ये नियुक्त करणे हे स्थानिक प्रशासन आणि राजकीय दबावाचा परिणाम आहे, असा आरोपही त्यांनी केला. Chandrapur forest officer suspension demand

या प्रकरणी रेड्डी यांची चौकशी करून निलंबन करावे, वन अकादमीतील सर्व खरेदीसंबंधी संपूर्ण ऑडिट करून भ्रष्टाचार बाहेर काढावा, या प्रकरणातील जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत आणि सरकारी निधीची वाया गेलेली रक्कम जबाबदार अधिकाऱ्यांकडून वसूल करावी, अशी मागणी ‘आप’ने केली आहे. या प्रकरणाची तात्काळ चौकशी आणि कारवाई न झाल्यास ‘आप’ मोठ्या आंदोलनाचा इशारा दिला आहे.