Chandrapur Forest Fire
Chandrapur Forest Fire : चंद्रपूर मुल मार्गालगतच्या चंद्रपूर वन विकास महामंडळाच्या जंगलाला भीषण लागल्याची घटना आज रविवारी साडेतीनच्या सुमारास समोर आली आहे. आगीने रौद्ररूप धारण केला असून आग आटोक्यात आणण्यासाठी वन विकास महामंडळाचे यंत्रणा शर्तीचे प्रयत्न करीत आहे. या आगीत जंगलातील मौल्यवान वनस्पती नष्ट होण्याचा धोका आहे असे वर्तविण्यात येत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी
चंद्रपूर हा उष्ण जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथे मार्च महिन्यापासूनच तापमान चढायला लागते. सध्या स्थितीत चाळीसीच्या आसपास तापमान आहे. याचवेळी दरवर्षीच आगीच्या घटना समोर येतात. तासभरापूर्वीच चंद्रपूर वनविकास महामंडळाच्या जंगलाला भीषण आग लागली आहे. FDCM forest fire
चंद्रपूर ते मूल महामार्ग लगत असलेल्या लोहारा ते घंटाचौकी या भागात लागली आहे.आगीत खूप मोठ्या प्रमाणात जंगल जळत आहे. आगीने रौद्ररूप धारण केला आहे. आग लागल्याची माहिती समोर आल्यानंतर वनविभागास महामंडळाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. आणि आग विझवण्यासाठी यंत्रणा सज्ज केली आहे. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु आग अद्यापही आटोक्यात आलेली नाही. कडक ऊन असल्यामुळे रस्त्याच्या कडेने आग धडकत आहे. forest fire Maharashtra
ज्या भागामध्ये आग लागली आहे त्याच परिसरात सागाचा घनदाट जंगल आहे. आज रविवारी चंद्रपूरचा तापमान चाळीस वर्षाच्या वर गेला आहे. शिवाय पानगळ झाल्यामुळे जंगलात पालाचोळा जंगलात पडला असल्यामुळे आग भडकत आहे. आगीचा आगीचा विळखा वाढतो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. वृत्त लिहीपर्यंत आग पूर्णतः विझलेली नव्हती.