Chandrapur industrial fire
Chandrapur industrial fire : चंद्रपूर: शहरालगत असलेल्या एमआयडीसी परिसरात आज (सोमवार) दुपारी १२ वाजता लकी पेट्रोलियम या तेल शुद्धीकरण करणाऱ्या कारखान्यात भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी या दुर्घटनेत कारखान्यातील संपूर्ण तेलसाठा आणि उपकरणे जळून खाक झाली आहेत. Lucky Petroleum fire incident
चांगल्या कामासाठी सुधीर मुनगंटीवार नेहमी पुढेच – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ज्वलनशील साठ्यामुळे आगीने घेतले रौद्र रूप
लकी पेट्रोलियम कारखान्यात मोठ्या प्रमाणात ज्वलनशील पदार्थ साठवलेले असल्याने आगीने काही क्षणांतच भयानक रूप धारण केले. परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले होते, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. Industrial fire accident
सुदैवाने जीवितहानी टळली
या आगीत मोठे आर्थिक नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, आगीचे नेमके कारण काय होते याचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे. या दुर्घटनेमुळे एमआयडीसी परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
स्थानिक प्रशासन आणि अग्निशामक दलाच्या तातडीच्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी औद्योगिक सुरक्षेच्या दृष्टीने अधिक कडक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.