Chandrapur law and order
Chandrapur law and order : चंद्रपूर : जिल्ह्यात गुन्हेगारीचा सुळसुळाट वाढला असून आता पोलिसांवरच हल्ले होऊ लागले आहेत. काही दिवसांपूर्वीच जटपूरा गेटजवळ एका पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला झाला होता. ही घटना ताजी असतानाच, पठाणपुरा गेटजवळील एका बार बाहेर दोन पोलिसांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एक पोलीस ठार झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही परिस्थिती अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक आहे, अशी प्रतिक्रिया चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटीचे शहर जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी दिली आहे. Chandrapur Ritesh Tiwari
चंद्रपूर शहरात खुनी तांडव, पोलिसांसमोर पोलिसाची हत्या
तिवारी यांनी सांगितले की, गुन्हेगारांचा वाढता आत्मविश्वास आणि कायदा-सुव्यवस्थेचा बिघडलेला धागा, हे सरकारच्या अपयशाचे प्रतीक आहे. आता प्रश्न असा आहे की, या गुन्हेगारांना नेमका कोणाचा आश्रय मिळतोय? चंद्रपूर शहरात दिवसाढवळ्या गुन्हे घडत असताना, पोलिसांवरच हल्ले होणे म्हणजे कायदा-सुव्यवस्थेचा पूर्णत: बिघाड झाल्याचे स्पष्ट होते. Chandrapur crime
राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून आपण त्वरित कारवाई करावी, अन्यथा नागरिकांचा पोलिसांवरील आणि प्रशासनावरील विश्वास उडण्याचा धोका आहे. चंद्रपूरला पुन्हा सुरक्षित करण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे, अशी मागणी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केली आहे. Chandrapur police attack
या घटनेने शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांवरच होणाऱ्या हल्ल्यांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सरकारने याची गंभीर दखल घेतली नाही, तर जनतेचा रोष उफाळून येईल, असा इशाराही तिवारी यांनी दिला आहे.