Chandrapur police action
Chandrapur police action : चंद्रपूर शहरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बे-लगाम व बेशिस्त प्रतिष्ठानावर चंद्रपूर शहर व रामनगर पोलिसांनी कारवाई केली.
7 मार्च ला पिंक पॅराडाईज बार मध्ये झालेल्या वादात पोलीस कर्मचाऱ्याची हत्या करण्यात आली होती.
त्या घटनेनंतर पोलीस प्रशासनाला जाग आली आणि नियमांचे व अनुज्ञप्ती चे उल्लंघन केले म्हणून पिन पॅराडाईज बार ला टाळे ठोकण्यात आले.
प्रदूषणाच्या आगीत सापडलं चंद्रपूर
शहरात असे अनेक नियमांना डावलत आपली प्रतिष्ठाने रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवतात अश्या एकूण 15 प्रतिष्ठानावर पोलिसांनी कारवाई केली.
शहर हद्दीतील फ्रेंड्स बार, सिटी बार, करन बार, दीपक बार तर रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राहुल धाबा, टू-किचन हॉटेल, मेजबाण बिर्याणी, आईस्क्रीम पार्लर, इटनकर पानठेला, सपना टॉकीज जवळील पान ठेला अश्या विविध प्रतिष्ठानावर कारवाई करण्यात आली. Chandrapur establishments violating norms
पोलिसांनी प्रतिष्ठान चालकाना नियमानुसार वेळेवर प्रतिष्ठान बंद व सुरू करण्याच्या सूचना केल्या.
शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सण व उत्सव काळात कुणीही नियमांचे उल्लंघन करू नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दिला. Chandrapur police