Chandrapur police murder
Chandrapur police murder : 2 लहानपणाचे पोलीस मित्र बिअर पिण्याचा बेत आखतात मात्र काही वेळातच या मित्रांपैकी एकाचा निर्घृण खून होतो. ही हादरवणारी घटना चंद्रपूर शहरातील पठाणपुरा जवळील पिंक पॅराडाईज बार जवळ 7 मार्चला घडली.
मृतक पोलीस कर्मचारी दिलीप चव्हाण मोटर परिवहन विभागात कार्यरत होता, तर राजुरा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत संदीप चाफले हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले.
37 वर्षीय पोलीस कर्मचारी संदीप चाफले हे 26 फेब्रुवारी पासून वैद्यकीय कारणापासून रजेवर होते, त्यांचं घर हे चंद्रपुरातील पठाणपुरा जवळ आहे.
26 फेब्रुवारी पासून समीर चाफले आपल्या घरी चंद्रपुरात राहत होते, दिलीप चव्हाण सोबत ते रोज भेटत होते.
7 मार्च दिलीप व समीर नेहमीप्रमाणे भेटले, मात्र हा दिवस मैत्रीचा शेवट होता असे दोघांनाही वाटले नव्हते.
आज आपण बिअर प्यायची असा बेत दोघांनी आखला. आणि पठाणपुरा येथील पिंक पॅराडाईज बार मध्ये दोघे बिअर पिण्यासाठी गेले. Police officer killed in Chandrapur
चंद्रपूर हादरलं, बार समोर खुनी तांडव
बार मध्ये समीर च्या लहान भावाचे मित्र भेटले होते, हाय हॅलो केल्यानंतर नितेश जाधव (समीर च्या लहान भावाचा मित्र) याचे बारच्या काउंटरवर ड्रिंक च्या पैश्याबाबत बोलणे सुरू होते.
त्यावेळी नितेश ला समीर ने कशाला हुज्जत करतो पैसे देऊन टाक असे म्हणाला मात्र नितेशचा मित्र अक्षय शिर्के हा समीर ला शिवीगाळ करू लागला. तू बार चा मॅनेजर आहे काय? असे म्हणत समीर ला अश्लील भाषेत आई-बहिणीवरून शिविगाळी केली, शिव्या कशाला देत आहे या शब्दात दिलीप चव्हाण ने मध्यस्ती केली यावरून दिलीप व अक्षय मध्ये झटापट झाली. Dilip Chavan murder case
वाद वाढत असताना समीर ने आपण बार च्या बाहेर बोलू असे सांगितले, व नितेश, समीर, दिलीप व अक्षय हे बाहेर आले, त्या दरम्यान अक्षय ने आपल्या मित्राला कॉल करीत सामान घेऊन ये असा बोलला.
नितेश, समीर व दिलीप हे तिघे बोलत असताना अक्षय ने गल्लीत या असा दम दिला.
त्यावेळी अनोळखी युवकाने अक्षयला धारदार हत्यार दिले, काही समजायच्या आत अक्षय ने दिलीप व समीर वर सपासप वार केले. Crime in Chandrapur city
दिलीप च्या हातावर, छातीवर व पाठीवर व समीर च्या हातावर वार केला, अचानक घडलेल्या या घटनेमुळे समीर ने दिलीप ला उचलत बाजूला केले, नागरिक व समीरच्या पत्नीने दोघांना दुचाकीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी दिलीप ला मृत घोषित केले.
शहरात पोलीस कर्मचाऱ्याची हत्या झाली ही बाब वाऱ्यासारखी पसरली, पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले, पोलिसांनी या प्रकरणात अक्षय शिर्के, नितेश जाधव व यश समुद या तिघांना अटक केली.
क्षुल्लक श्या वादावरून जर चाकूने हल्ला करण्याची लोकांची मजल होत असेल तर मग गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे असे दिसत आहे. या गुन्हेगारांना भर चौकात चाबकाने सोलून काढून तप्त तेलातून उकळून काढावे.
म्हणजे भीती तरी निर्माण होईल.