Chandrapur protest against Prashant Koratkar । फरार कोरटकरला चंद्रपूरमध्ये मदत करणारे कोण? – हॉटेल चालक व अधिकाऱ्यांची चौकशी होणार!

Chandrapur protest against Prashant Koratkar

Chandrapur protest against Prashant Koratkar : शिवद्रोही प्रशांत कोरटकर यांनी प्रसिद्ध इतिहास तज्ञ इंद्रजीत सावंत कोल्हापूर यांना फोनवरून धमकी देत असताना छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल अनेक आक्षेपार्य विधान केले. याचा राग अनावर होऊन कोल्हापूर येथील शिवप्रेमी नागरिकांनी प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

आगामी सणांच्या पार्शवभूमीवर प्रशासनाची महत्वाची बैठक

प्रशांत कोरटकर या विकृत व्यक्तीने पोलिसांपुढे शरण जाऊन चौकशीस मदत करण्याच्या ऐवजी एक महिनाभर फरार राहून त्यांनी केलेले वक्तव्य हे चुकीचे होते तसेच जाणीवपूर्वक जातीय तेढ निर्माण करणारे होते हे सिद्ध केले आहे. प्रशांत कोरटकर फरार असताना चंद्रपूर येथे येऊन दोन दिवस मुक्कामास होता. तो ज्या हॉटेलमध्ये मुक्कामास होता त्या हॉटेल मालकास हा व्यक्ती फरार आहे व पोलीस याच्या शोधात आहे हे माहीत असताना देखील तेथे वास्तव्यास कसे ठेवले? हा मोठा गंभीर प्रश्न आहे. Who is Prashant Koratkar?

सोबतच दोन व्यक्तींनी त्याला येथे राहण्याची तसेच चंद्रपूर येथून तेलंगणामध्ये पळून जाण्याची संपूर्ण व्यवस्था केली. त्याला भेटायला पोलिस अधिकारी सुद्धा गेले होते अशी माहिती समोर येत आहे. ज्याप्रमाणे प्रशांत कोरटकर यांनी संपूर्ण जगभरातील शिवप्रेमींचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचा अवमान केला. त्याचप्रमाणे त्यांना संरक्षण देऊन व सोबत करून वरील दोन व्यक्ती, पोलिस अधिकारी व येथील त्याला आश्रय देणारा हॉटेल चालक यांनी देखील शिवरायांच्या अवमानामध्ये प्रशांत कोरटकर यांची सोबत केल्याची आम्ही सर्व चंद्रपूरकर शिवप्रेमी नागरिकांची भावना झालेली आहे. म्हणून याची दखल घेऊन तात्काळ या सर्वांना अटक करावे व त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. Shivaji Maharaj controversy news

तसेच एका फरार आरोपीला ज्यांनी आपल्या हॉटेलमध्ये आश्रय दिला त्या हॉटेलचे व्यावसायिक प्रमाणपत्र रद्द करून हॉटेलवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी प्रा. डॉ. दिलीप चौधरी, जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड, नवनाथ देवकर, लोक स्वराज फाउंडेशन, नीलकंठ पावडे, कुणबी समाज संघटना, संदीप गिर्हे, जिल्हाप्रमुख शिवसेना (उबाठा) अशोक मस्के, स्वतंत्र मजदूर युनियन, प्रमोद देरकर, जिल्हाध्यक्ष लोक स्वराज पार्टी, प्रा. डॉ. योगेश दुधपचारे, इतिहास अभ्यासक, विनोद थेरे, महानगराध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, अतुल टोंगे, संभाजी ब्रिगेड, ॲड. देवा पाचभाई, विदर्भ अध्यक्ष सरपंच संघटना, प्रा. डॉ. किरणकुमार मनुरे, अभ्यासक, दीपक जेऊरकर, प्रदेश उपाध्यक्ष मराठा सेवा संघ, प्रा. डॉ. सुभाष गिरडे, अभ्यासक, राजेश ठाकरे, सुजित पेंडोर, गणेश ठाकूर, राकेश कालेश्वर, इत्यादी विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!