Chimur tension over Sambhaji Maharaj post
Chimur tension over Sambhaji Maharaj post : सोशल मीडियावर छत्रपती संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने चिमूर शहरात तणाव निर्माण झाला. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल करत आरोपीच्या अटकेची मागणी केली. त्यांनी संभाजी चौकात घोषणाबाजी केली.
आरोपीच्या चिकन दुकानाची तोडफोड केली. तसेच टायरही जाळले. आरोपी युवकाने इन्स्टाग्रामवर महाराजांविरोधात पोस्ट टाकली. यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. शहरात तणाव वाढल्याने रात्री उशिरा दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले. Sambhaji Maharaj objectionable post
या कारणामुळे चंद्रपुरात झाली पोलिसांची हत्या
आरोपीला भिसी पोलिस ठाण्यात नेण्यात आले. मात्र, तेथेही जमाव जमल्याने त्याला पुन्हा चिमूर पोलिस ठाण्यात आणण्यात आले, आरोपीवर माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन बंदोबस्त वाढवला.
पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी नागरिकांना आवाहन केले कि कुणीही समाज माध्यमांवर धार्मिक, जातीय व आक्षेपार्ह पोस्ट करीत सामाजिक शांतता भंग करू नये असे केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.