cockfight betting police action । कोंबडा लढतीवर पोलिसांचा छापा! लाखोंचा जुगार उघड, चार आरोपी अटकेत

cockfight betting police action

cockfight betting police action : कोरपना पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोंबडा लढतीवर हारजीत चा जुगार खेळणाऱ्या कोंबडा बाजारावर स्थानिक गुन्हे शाखेने धाड मारत एकूण २ लाख ४५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, या प्रकरणी ४ आरोपींवर जुगार प्रतिबंधित कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोंबड्याची झुंज लावत त्यावर पैसे लावत जुगार खेळल्या जातो, काही पोलीस पथक कारवाई करण्यात यशस्वी होतात तर काही यांच्यापर्यंत पोहचू शकत नाही. cockfight gambling raid Maharashtra

वन अकादमीमध्ये भ्रष्टाचार, आपने मुख्य वनसंरक्षकांवर लावला आरोप

कोरपना पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लोणी गावात कोंबडा झुंजीवर पैसे लावत जुगार खेळला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने कोंबडा बाजारावर धाड मारली.

अचानक पडलेल्या धाडीने जुगार खेळणारे सैरावैरा पळू लागले मात्र यामधील ४० वर्षीय अमोल साधूजी खरवडे, २९ वर्षीय संजय शालिक क्षीरसागर राहणार कोरपना, ५४ वर्षीय अनिल किसन बेलेकर राहणार यवतमाळ, ४६ वर्षीय राजेंद्र नानाजी खिरटकर राहणार यवतमाळ हे पोलिसांच्या हाती लागले.

आरोपींजवळून रोख रक्कम, ४ जिवंत कोंबडे, ४ मोटारसायकल सह एकूण २ लाख ४५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. आरोपीवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कलम १२ (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोरपना पोलीस करीत आहे.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतुर्त्वात सपोनि दीपक कांक्रेडवार, बलराम झाडोकर, संतोष निंभोरकर, पोलीस पथकातील कर्मचारी किशोर वैरागडे, अजय बागेसर, जय सिंग, संतोष येलपुलवार, प्रमोद कोटनाके, मिलिंद जांभुळे व दिनेश अराडे यांनी केली.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!