Construction material distribution
Construction material distribution : महाराष्ट्र शासनातर्फे नोंदणीकृत मजुरांना सुरक्षा व आवश्यक साहित्य देण्यात येते. त्या साहित्याचे वितरण एमआयडीसी येथून होत आहे. परंतु, पोर्टल च्या तांत्रिक अडचणींमुळे मागील दोन ते तीन दिवसांपासून बांधकाम साहित्याचे वितरण बंद आहे. अनेक बांधकाम मजुर जिल्हाभरातून साहित्य घेण्याकरीता रोजगार सोडून एमआयडीसी येथे उपस्थित झाले. परंतु पोर्टल तांत्रिक अडचणीमुळे बंद (Labor portal technical problem)असल्याचे कारण सांगुन मजुरांना माघारी जावे लागले.
पोलिसांची हत्या झाली आणि चंद्रपूर पोलिसाना नियमांची आठवण झाली
या संदर्भात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सहायक आयुक्ताशी चर्चा करुन जिल्हास्तरावरुन बांधकाम साहित्याचे वितरण न करता तालुकास्तरावर बांधकाम साहित्याचे वितरण करण्यासंदर्भात सहाय्यक कामगार आयुक्तांना सूचना दिल्या.
कामगार विभागाच्या माध्यमातून मजुरांना वितरीत करण्यात येणारे साहित्य घेऊन जाण्याकरीता जिल्हातून महिला व पुरुष मजुर मोठ्या प्रमाणात उपस्थित झाले. काही मजुरांनी सदर साहित्य घेण्याकरीता दोन ते तीन दिवसांपासून एमआयडीसी (MIDC distribution issues)येथील साहित्य वितरण परिसरात तळ ठोकून बसले आहे. परंतु, पोर्टल मध्ये तांत्रिक अडचणी आल्यामुळे मजुरांचा भ्रमनिरास झाला.
या संदर्भात खासदार धानोरकर यांनी सहाय्यक कामगार आयुक्तांना पत्र पाठवून तसेच, त्यांच्याशी चर्चा करुन जिल्हातून कुठलाही कामगार साहित्य घेण्याकरीता चंद्रपूर ला येऊ नये. तसेच, बांधकाम साहित्याचे वाटप तालुकास्तरावरुन करावे अशा सुचना दिल्या. तसेच पोर्टल मध्ये तांत्रिक अडचणी येत असल्यास मजुरांना त्रास होऊ नये या करीता मोबाईल वर संदेश पाठवावा अशा देखील सुचना खासदार धानोरकर (MP Pratibha Dhanorkar) यांनी केल्या. या संदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे सहाय्यक कामगार आयुक्त श्री. धुर्वे यांनी सांगितले.