court case for traffic violation
वाहतूक दंड: भरला नाही, तर थेट कोर्टात खटला!
court case for traffic violation : जर तुम्ही वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले असेल आणि दंड भरला नसेल, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आता वाहनांवर थकीत दंड असल्यास, वाहनचालकांवर थेट न्यायालयात खटला दाखल होणार आहे. त्यानंतर तुम्ही इतर कोणत्याही माध्यमातून दंड भरू शकणार नाही.
अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक यांच्याकडून आदेश जारी:
राज्यातील कसूरदार वाहनचालक/मालक यांच्यासाठी ‘वन स्टेट वन ई-चलन‘ अंतर्गत वाहनावर थकीत दंड असल्यास, तो ९० दिवसांच्या आत भरणे बंधनकारक आहे. दंड न भरल्यास, थेट न्यायालयात तुमच्याविरुद्ध खटला दाखल होऊ शकतो. e-challan payment online
चंद्रपुरात शिक्षकचं निघाला कॉपी बहाद्दर
चंद्रपूर जिल्ह्यात अनेक वाहनांवर दंड प्रलंबित:
चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक वाहनचालकांवर दंड प्रलंबित आहे. त्यांनी तातडीने जवळच्या पोलीस स्टेशन किंवा वाहतूक शाखेत जाऊन थकीत दंड भरावा. न्यायालयात खटला दाखल होण्यापूर्वी नागरिकांनी आपल्या वाहनावरील थकीत दंड भरावा, असे आवाहन चंद्रपूर जिल्हा वाहतूक शाखेद्वारे करण्यात आले आहे. Chandrapur traffic rules
महत्त्वाचे मुद्दे:
- ९० दिवसांची मुदत: ‘वन स्टेट वन ई-चलन’ (one state one e-challan system
) अंतर्गत दंड भरण्यासाठी ९० दिवसांची मुदत आहे. - न्यायालयात खटला: मुदतीत दंड न भरल्यास, थेट न्यायालयात खटला दाखल होईल.
- तातडीने दंड भरा: चंद्रपूर जिल्ह्यातील वाहनचालकांनी तातडीने थकीत दंड भरावा.
- आवाहान: चंद्रपूर जिल्हा वाहतूक शाखेकडून नागरिकांना दंड भरण्याचे आवाहन.