Cricket Betting Scam Busted । चंद्रपूरमध्ये आंतरराष्ट्रीय बेटिंगचा भांडाफोड, ऑनलाईन क्रिकेट सट्टयाच्या चक्रव्यूहाला स्थानिक गुन्हे शाखा भेदणार का?

Cricket Betting Scam Busted

क्रिकेट सट्टा जाळं नागपुरातून दुबईपर्यंत! ६० लाख रुपयांचा व्यवहार उघड

Cricket Betting Scam Busted : ३ वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यात आयपीएल क्रिकेट सट्टा जुगार प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली होती, त्या प्रकरणी तब्बल ५० च्या वर आरोपीना अटक करण्यात आली होती, गडचिरोली पोलिसांनी एक मोठं नेटवर्क उध्वस्त करण्याची मोहीम त्यावेळी हाती घेतल्याने आयपीएल क्रिकेट वर सट्टा खेळणाऱ्यांचे धाबे दणाणले होते. ३ वर्षांनी चंद्रपुरात स्थानिक गुन्हे शाखेने चॅम्पियन्स ट्रॉफी च्या अंतिम सामन्यात सट्टा घेणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे, विशेष म्हणजे या कारवाईत विविध जिल्हे व परराज्यातील ३८ बँक खाते पोलिसांनी गोठविले आहे. Online Betting Racket Exposed

९ मार्च रोजी भारत विरुद्ध न्यूजीलँड चॅम्पियन्स ट्रॉफी च्या अंतिम सामन्यात मोठ्या प्रमाणात जुगार घेत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेलं कस्तुरबा रोडवरील हॉटेल व्यंकटेश या ठिकाणी गुन्हे शाखेने छापा टाकला. हॉटेलच्या एका रूम मध्ये पारस दादाराव उखाडे, अविनाश नारायण हांडे राकेश अरुण कोंडावार हे ऑनलाईन बेटिंग आयडी पुरविणाऱ्या साईटवर बेटिंग करीत असताना मिळून आले.

व्हेज बिर्याणी मध्ये मिळाली अळी, चंद्रपूर शहरातील संतापजनक प्रकार

यावेळी आरोपीकडून पाच मोबाईल, टीव्ही संच, रोख रक्कम असा एकूण १ लाख ७६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत आरोपींवर शहर पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष बाब म्हणजे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींवर यापूर्वी क्रिकेट बेटिंग संदर्भात गुन्हे दाखल आहे. सदर तिन्ही आरोपी हे विविध लोकांना आयडी पासवर्ड देत बेटिंगच्या पैश्याची देवाणघेवाण करतात. या देवाणघेवाण साठी आरोपींची वेगवेगळ्या बँकेत तब्बल ३८ बँक खाते उघडले होते. यामध्ये काही खाते हे परराज्यातील आहे. स्थानिक गुन्हे शाखेने सायबर पोलिसांच्या मदतीने जवळपास ६० लक्ष रुपयांपर्यंतची रक्कम गोठविली आहे. Nagpur-Based Online Betting Empire

आरोपींची काही आंतरराष्ट्रीय क्रमांकावर सुद्धा क्रिकेट बेटिंग संदर्भात चॅटिंग केली आहे. त्यामध्ये लाखोंच्या व्यवहाराचा उल्लेख आहे. आरोपींच्या मोबाईलची तपासणी केली असता चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, गडचिरोली व इतर शहरात हे आरोपी ऑनलाईन बेटिंग करतात.

काही वर्षांपूर्वी क्रिकेट सट्टा च्या दुनियेत धुमाकूळ घालणाऱ्या allpanelexch.com, nice7777.fun व nice.45-tech यांचा उल्लेख या कारवाई दरम्यान पोलिसांना मिळाला. ऑनलाईन बेटिंग साईट बनविणारे व आरोपी इसमांना पुरविणाऱ्याबाबत पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे.

२ वर्षांपूर्वी news३४ ने क्रिकेट सट्टा बाबत बातम्या प्रकाशित केल्यावर पोलीस प्रशासन खळबळून जागे झाले होते, त्यांनतर स्थानिक गुन्हे शाखेने ऑनलाईन बेटिंग करणाऱ्यांचे नेटवर्क उध्वस्त केले होते, मात्र या नेटवर्क मधील मुख्य सूत्रधार यांच्यापर्यंत पोलीस कधीच पोहचू शकले नाही. या कारवाईनंतर स्थानिक गुन्हे शाखा ऑनलाईन क्रिकेट बेटिंगचे नेटवर्क उध्वस्त करणार काय? कि हि कारवाई फक्त नावापुरतीच राहायला नको. Police Raid Cricket Betting Hub

ऑनलाईन बेटिंग चे नेटवर्क हे नागपुरातून सुरु होत संपूर्ण महाराष्ट्रात पसरले आहे, जर कुणाला हि बेटिंग सुरु करायची असेल तर त्याला प्रशिक्षण घावे लागते. प्रशिक्षण हे नागपूर मध्ये नव्हे तर थेट दुबई मध्ये दिल्या जाते हे विशेष. आयपीएल असो कि वर्ल्ड कप सामन्यादरम्यान दररोज हजारो कोटींचा सट्टा या माध्यमातून खेळला जातो. International Cricket Betting Links Exposed

ऑनलाईन बेटिंग च्या दुनियेत काम करणारे काही राजकीय पदाधिकारी सुद्धा आहे, या गुन्ह्यात मिळालेले आरोपी यांच्यावर यापूर्वी सुद्धा क्रिकेट बेटिंग संदर्भात गुन्हे दाखल आहे. एक आरोपीवर गडचिरोली जिल्ह्यात गुन्हा दाखल आहे. आजपर्यंत क्रिकेट बेटिंगच्या या चक्रव्यूहाला पोलीस प्रशासन भेदू शकले नाही, मात्र या कारवाईत पोलिसांनी मोठा खुलासा करीत ३८ बँक खाते व आंतरराष्ट्रीय बेटिंग बाबत माहिती पुढे आणली आहे. नव्याने रुजू झालेले स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे क्रिकेट बेटिंगच्या दुनियेतील चक्रव्यूहाला भेदणार काय हे बघणे महत्वाचे असणार आहे.

चंद्रपुरात विविध भागात क्रिकेट सट्टा बहाद्दूर कार्यरत आहे, या सट्टा बहाद्दर यांच्या त्रासापायी पैसे हरलेले मुलांनी आपलं आयुष्य संपविल्याची घटना घडली होती अशी माहिती आहे. ज्याप्रमाणे नवे पोलीस निरीक्षक काचोरे यांनी कारवाई केली त्याचप्रमाणे या क्रिकेट सट्टा बहाद्दर यांच्या संपत्तीबाबत चौकशी केल्यास त्यांनाही मोठा धक्का बसेल हे नक्कीचं.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!