Elderly Harassment Police
Elderly Harassment Police : चंद्रपूर – राज्यात आज गुन्हेगारीने डोकं वर केल्याचं दिसून येत आहे, गुन्हेगाराला अनेकदा पोलिसांनी सहकार्य केल्याचं दिसून येतंय, अजूनही पोलिसांच्या भूमिकेत बदल होताना दिसून येत नाही आहे.
एखाद्याची तक्रार घेत ऐकून घ्यावं इतकीही मानसिकता आता पोलीस दलात आहे की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. (Chandrapur Police)
चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी जिल्ह्यातील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार निवारण मोहीम सुरू केली, या मोहिमेचा सर्व सामान्य नागरिकांना काही प्रमाणात फायदा मिळाला मात्र काही बाबी उलट घडल्या.
चंद्रपूर जिल्ह्यातील 82 वर्षीय वृद्धाला मारहाण करण्यात आली, वृद्धाने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी उपस्थित महिला पोलिसाने 4 हजार रुपये घ्या पण तक्रार करू नका असे पीडित वृद्धांच्या पत्नीला म्हटले, पैसे घेण्यास नकार दिल्यावर महिला पोलिसाने या म्हातारीला बाजूला करा, नाहीतर लॉकअप मध्ये टाका असे खडसावले. व पीडित वृद्धाला बाजूला नेत आपण 2 हजार रुपये घ्या पण तक्रार करू नका असे सांगत तुमचे उपचार मारहाण करणारे करतील असे सांगितले. Police Complaint Refused
आरोपीने वृद्धाला दवाखान्यात नेत उपचार केले, विशेष बाब म्हणजे वृद्धाची तक्रार घेण्यात आली नाही. महिला पोलिसाच्या सांगण्यावरून पीडित वृद्धाला पैसे दिले, आपल्यावर झालेल्या मारहाणीमुळे अस्वस्थ झालेल्या वृद्धाने रात्री पुन्हा पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. सोबतच पोलीस स्टेशनमध्ये घडलेला प्रकार व त्या महिला पोलिसांच्या वागणुकीची तक्रार पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली. Chandrapur Police Misbehavior
घटना काय?
चिमूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नेरी येथील देवीधर डोनाजी काटेकर वय ८२ वर्षे यांना घराजवळ राहणाऱ्या युवकांने मारहाण केल्याची तक्रार चिमूर पोलिसात दिनांक २७ फेब्रुवारी ला दाखल केली असून आरोपी विजय प्रभाकर बारेकर वय ४० यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
22 मार्च रोजी चंद्रपुरात राष्ट्रीय लोक अदालत
नेरी येथील ज्योतिबा फुले वॉर्डात राहणारे देवीधर काटेकर शेळ्या गाई राखण्याचे काम करतात त्यांच्या गाई घराजववळ बांधून असताना शेजारी राहणारे विजय बारेकर आपली गाडी धूत असता गाडी दूर धुवावी असे म्हटले असता विजय बारेकर यांनी शिवीगाळ करीत मारहाण केली व काठीने सुद्धा मारल्याची तक्रार पोलिसात दिली. चिमूर पोलिसांनी तक्रारी वरून विजय बारेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला तर विजय बारेकर यांनीही दिलेल्या तक्रारी वरून वृद्ध देवीधर काटेकर यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या या कार्यप्रणालीमुळे कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे उडत आहे, अन्याय झालेल्या वृद्धाची तक्रार घेण्याऐवजी त्याला पैश्याचे आमिष दाखवीत माघारी पाठविण्याचे काम करणाऱ्या त्या महिला पोलीसाला निलंबित करावे अशी मागणी होऊ लागली आहे. असे प्रकार पोलिसांच्या हातून घडणार तर न्याय कुणाला मिळणार हा प्रश्न त्या महिला पोलिसांच्या कार्य प्रणालीमुळे उपस्थित झाला आहे. त्या महिला पोलिसाने असा प्रकार यापूर्वी केला आहे काय? याची सुद्धा चौकशी करण्यात यावी.