fire proximity suit
fire proximity suit : राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानाने चंद्रपूर जिल्ह्यातील नगर परिषद व नगर पंचायत येथे कार्यरत असलेल्या अग्निशमन दलातील जवानांना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष विनय गौडा जी.सी. यांच्या हस्ते फायर प्रॉक्झिमिटी सूट ( fire proximity suit ) चे वितरण करण्यात आले.
उपरवाही येथील जिल्हा परिषद शाळेला जिल्हाधिकारी गौडा यांची भेट
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, नगर प्रशासन अधिकारी डॉ. विद्या गायकवाड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सलीम शेख, तसेच ब्रम्हपूरी, वरोरा, बल्लारपूर, राजुरा, भद्रावती, चिमूर येथील नगर परिषदांचे मुख्याधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी यांनी अग्निशमन दलाच्या जवानांच्या कामाचे कौतुक केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
काय आहे फायर प्रॉक्झिमिटी सूट : हे अग्निशामक आणि इतर धोक्याच्या परिस्थितीत काम करणाऱ्या व्यक्तींना उच्च तापमानापासून आणि ज्वालांपासून संरक्षण करण्यासाठी डिझाइन केलेले विशेष सुरक्षा उपकरण आहे, ज्याला चांदीचा बंकर सूट असेही म्हणतात.
फायर प्रॉक्सिमिटी सूटचे उपयोग
अग्निशामकांना संरक्षण : अग्निशामक (firefighter) आग विझवण्याच्या कामात थेट ज्वालांच्या संपर्कात येतात, अशा स्थितीत त्यांना या सूटमुळे उष्णतेपासून आणि जाळणाऱ्या पदार्थांपासून संरक्षण मिळते. firefighter protective suit
धोकादायक परिस्थितीत काम करणाऱ्यांना संरक्षण : ज्वालामुखीशास्त्रज्ञ, औद्योगिक कामगार आणि इतर धोक्याच्या परिस्थितीत काम करणाऱ्यांना या सूटमुळे उष्णता आणि ज्वालांपासून संरक्षण मिळते.
विमान बचाव आणि अग्निशमन (ARFF) मध्ये वापर : विमान बचाव आणि अग्निशमन (ARFF) मध्ये, ≈500 °F (260 °C) पर्यंत वातावरणीय उष्णता संरक्षण प्रदान करण्यासाठी प्रॉक्सिमिटी सूट वापरले जातात.
आगीत अडकलेल्या लोकांना मदत : अग्निशामक या सूटचा वापर करून आगीत अडकलेल्या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढू शकतात.
हा सूट अग्निशमन जवानांना कोणत्याही फ्लेशओव्हरपासून अर्थात आगीच्या ज्वालांपासून वाचवेल. या सूटचे सर्व भाग युरोपीयन मानकांनुसार प्रमाणित करण्यात आले आहेत. सूटमध्ये जॅकेट, पॅन्ट हुड, हातमोजे, हेल्मेट आणि बूट यांचा समावेश आहे.