Gondwana University fee hike
Gondwana University fee hike : गोंडवाना विद्यापीठातर्फे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम सत्र २०२४-२५ या सत्राच्या मध्यतरी शैक्षणिक शुल्कात अचानक भरमसाठ वाढ केली असून गोंडवाना विद्यापीठाच्या संलग्नीत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलेले आहे. विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहीर यांची प्रत्यक्ष भेट घेवून विद्यापीठाने केलेल्या दरवाढीबाबत माहिती दिली.
श्री रघुवीर अहीर यांनी सदर शैक्षणिक दरवाढीची गंभीर दखल घेत दि. २५ मार्च रोजी भाजयुमो चे शिष्टमंडळ व विद्यार्थ्यांसह रघुवीर अहीर यांनी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांची भेट घेत शुल्कवाढ रद्द करण्याचे निवेदन दिले व शैक्षणिक सत्राच्या मध्यतरी केलेले शुल्कवाढ हे विद्यार्थ्यांवर अन्यायकारक असून विद्यार्थ्यांच्या हितासाठी ही शुल्कवाढ तात्काळ रद्द करावी व विद्यार्थ्यांना दिलासा देण्याबाबत सकारात्मक चर्चा केली.
यावेळी कुलगुरु डॉ. बोकारे यांनी याबाबत येत्या दोन दिवसात योग्य निर्णय घेवू असे आश्वासन शिष्टमंडळास दिले.