Illegal firearms seizure
Illegal firearms seizure : चंद्रपूर जिल्ह्यात अवैध धंद्यावर कारवाई बाबत पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला निर्देशित केले आहे. या अनुषंगाने 12 मार्च ला 28 वर्षीय युवकांकडून देशी कट्टा व जिवंत काडतुस जप्त करण्यात आले.
नियम मोडणाऱ्या 15 प्रतिष्ठानावर पोलिसांची कारवाई
बल्लारपूर मार्गावरील चुनाभट्टी येथे युवक आपल्यासोबत देशी कट्टा घेऊन वावरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली.
माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चुनाभट्टी पोहचत बस स्टॉप वर असलेला 28 वर्षीय संगम संभाजी सागोरे राहणार मित्रनगर, आंबेडकर कॉलेजच्या मागे चंद्रपूर याला अटक केली. Local crime branch
आरोपी युवकाकडून लोखंड गावठी बनावटीचा देशी कट्टा व 1 जिवंत काडतुस जप्त करण्यात आले.
आरोपीवर भारतीय हत्यार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करीत पुढील तपासासाठी आरोपीला बल्लारपुर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोलीस कर्मचारी सुनील गौरकार, सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, प्रशांत नागोसे, किशोर वाकाटे, शशांक बदामवार, अमोल सावे व दिनेश अराडे यांनी केली.