Inspirational study center for students | दिवंगत बाळुभाऊ धानोरकर अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान

Inspirational study center for students

Inspirational study center for students चंद्रपूर – विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी लायब्ररी आणि अभ्यासिका अत्यंत महत्त्वाच्या ठरत आहेत. शहरात मोठ्या प्रमाणात खासगी लायब्ररी सुरू होत असताना शासनाच्या लायब्रऱ्या मात्र दुर्लक्षित आहेत. मात्र, दिवंगत माजी खासदार बाळुभाऊ धानोरकर अभ्यासिका हे याचे अपवाद ठरले असून, पुढील काळात ही अभ्यासिका अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन प्राध्यापक राजेश पेचे यांनी केले. Career success stories of students

चंद्रपुरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर, कांग्रेसने केली ही मागणी

दिवंगत माजी खासदार बाळुभाऊ धानोरकर अभ्यासिकेच्या माध्यमातून दोन विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. कुमारी समिक्षा राजेंद्र आखरे हिची सहाय्यक अभियंता म्हणून महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड मध्ये निवड झाली आहे. तसेच, कुमारी नेहा खुशाल आंबोरकर हिची भद्रावती तालुका आरोग्य पथकात एंटोमोलॉजिस्ट (Entomologist) पदावर निवड झाली आहे.

चंद्रपुरातील या बालगृहात विविध पदांची पदभरती

या दोन्ही विद्यार्थिनींच्या सन्मानार्थ रविवार, 9 मार्च 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता साई मंदिर, दिवंगत माजी खासदार बाळुभाऊ धानोरकर अभ्यासिकेत सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला नागरिक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. यावेळी विविध मान्यवरांनी या विद्यार्थिनींच्या यशाचा गौरव करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. Balubhau Dhanorkar Study Center

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सेवानिवृत कार्यकारी अभियंता नरेंद्र बुरांडे यांनी भूषविले. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक राजेश पेचे, गणपर्व चॅरिटेबल ट्रस्ट,साई मंदीर भिवापूर वॉर्ड चंद्रपूर चे अध्यक्ष अशोक कोटकर, काँग्रेस अल्पसंख्यक नेते सोहेल रजा शेख, जिल्हा काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा सुनंदा धोबे, गुरुदेव सेवा मंडळ भिवापूर वॉर्ड महिला अध्यक्षा पुष्पा पायघन, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, माजी नगरसेवक राजेश आखरे, माजी नगरसेविका मंगला आखेर, नमस्ते चांदा फाउंडेशन चे सचिव गोविल मेहरकरे, नमस्ते चांदा फाउंडेशन चे कोषाध्यक्ष सागर महाडोळे, ॲड. गणेश अमृतकर, पांडूरंग आदे, संजू धोबे, दर्शन बुरडकर, योगेश देवतळे, सचिन किरणे, हर्षल विधाते, श्रेयस मैत्र यांची उपस्थिती होती.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!