International Womans day events । महिला सक्षमीकरण ही काळाची गरज – खासदार प्रतिभाताई धानोरकर

International Womans day events
जागतिक महिला दिनानिमित्त बाबूपेठ बचत गटाचा भव्य आनंद मेळावा!
International Womans day events : जागतिक महिला दिनानिमित्त दरवर्षी प्रमाणे या वर्षीही बाबूपेठ महिला बचत गटातर्फे आनंद मेळावा व डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम विविध क्षेत्रातील नामवंत मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

चंद्रपूर जिल्हा पोलीस दलात फेरबदल करा – आमदार किशोर जोरगेवार

कार्यक्रमाचे उद्घाटन चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार मा. प्रतिभाताई धानोरकर यांच्या शुभहस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. अपूर्वा बासूर (सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी) होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून मा. प्राजक्ता लालसरे (निरीक्षण अधिकारी, तहसील कार्यालय बल्लारपूर) उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजन बाबूपेठ महिला बचत गटाच्या संस्थापक अध्यक्ष सौ. चंदाताई वैरागडे यांच्या नेतृत्वाखाली अटल बिहारी वाजपेयी क्रीडा संकुल, बाबूपेठ येथे करण्यात आले. women empowerment programs

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांचे पूजन व माल्यार्पण करून केली. यानंतर प्रास्ताविक भाषणात चंदाताई वैरागडे यांनी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत बचत गटाचा उद्देश केवळ आर्थिक देवाणघेवाण नसून महिलांना सक्षम व आत्मनिर्भर बनविणे असल्याचे सांगितले. महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे. आनंद मेळाव्यात ५० पेक्षा अधिक महिलांनी स्वतःचे स्टॉल लावले होते तसेच डान्स स्पर्धेत अनेक महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. बचत गटाच्या माध्यमातून अनेक कुटुंबांना आधार मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

अपूर्वा बासूर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, “आजची नारी समाजाला योग्य दिशा देणारी शक्ती आहे. महिलांना उच्चपदस्थ स्थानांवर काम करताना पाहिले जाते, पण दुसरीकडे महिलांवरील अत्याचारही वाढत आहेत. महिलांनी निर्भयपणे या परिस्थितीचा सामना केला पाहिजे.”

खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी बचत गटाच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, “चंदाताई वैरागडे यांनी मोठ्या प्रमाणावर महिलांचे संघटन तयार करून त्यांच्या कलागुणांना वाव दिला आहे. आनंद मेळावा व डान्स स्पर्धेच्या माध्यमातून महिलांचा सहभाग वाढविण्याचे स्तुत्य कार्य झाले आहे. महिलांवरील वाढते अत्याचार पाहता महिलांचे सक्षमीकरण अधिक प्रभावीपणे करण्याची गरज आहे.” women’s rights awareness programs

woman empowerment programs

मान्यवरांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनानंतर महिलांनी आनंद मेळाव्यात स्वतः बनविलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर समूह नृत्य, मम्मी डान्स, आजी-नातीन डान्स यांसारख्या विविध प्रकारच्या नृत्य स्पर्धा पार पडल्या, ज्यामध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. तब्बल तीन तास रंगलेल्या या कार्यक्रमाने उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. तसेच, १४ जानेवारी रोजी झालेल्या रांगोळी स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. women’s cultural festivals

कार्यक्रमास बाबूपेठ महिला बचत गटाच्या सदस्यांसह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका खनके यांनी केले, तर आभार प्रदर्शन संजयजी सोनुने यांनी मानले.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!