Kishor Jorgewar on Gondwana University
Kishor Jorgewar on Gondwana University : गोंडवाना विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या शुल्कात अचानक वाढ करण्यात आल्याने विद्यार्थ्यांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या अन्यायकारक शुल्कवाढीविरोधात आमदार किशोर जोरगेवार यांनी विद्यापीठ प्रशासनाला निवेदन देत तात्काळ वाढ रद्द करण्याची मागणी केली आहे. Gondwana University student fee hike
खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या पत्रामुळे मोठा निर्णय होणार
विद्यापीठाने शैक्षणिक सत्र २०२४-२५ मध्ये शुल्कवाढ केली असून, यामुळे विद्यार्थी आणि पालकांवर मोठा आर्थिक बोजा पडत आहे. शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर मध्येच शुल्कवाढ करणे गैरव्यवहार्य आहे, यामुळे अनेक विद्यार्थी अडचणीत येण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना या वाढीचा फटका बसणार असून, त्यांच्या शिक्षणावर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.
त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून ही शुल्कवाढ तातडीने मागे घेण्यात यावी. तसेच भविष्यात अशा प्रकारचे निर्णय घेताना विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी निवेदनाच्या माध्यमातून कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांना केली आहे. Kishore Jorgewar against university fee increase
सोबतच आमदार किशोर जोरगेवार यांनी कुलगुरू यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत शुल्कवाढ रद्द करण्याची मागणी केली. यावेळी आठवडा भरात याबाबत निर्णय घेण्याचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी मान्य केले आहे.