Mayur Raikwar Threat Case
Mayur Raikwar Threat Case : चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात हवेली गार्डन ते आकाशवाणी रोडवरील नाल्याच्या संरक्षण भिंतीच्या बांधकामात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. या बांधकामासाठी 95 लाख रुपये खर्च करण्यात येत असून, केवळ एका बाजूलाच भिंत उभारली जात आहे, तर दुसऱ्या बाजूला हजारो लोकांची वस्ती असूनही कोणतीही भिंत उभारली जात नाही. यावरून, हा निधी सार्वजनिक हितासाठी वापरला जात आहे की स्थानिक आमदारांच्या नातेवाईकांच्या फायद्यासाठी, असा प्रश्न आम आदमी पार्टीने उपस्थित केला आहे. Chandrapur Nala Protection Wall
चंद्रपूर शहरात झळकले मालमत्ता कर थकबाकीदारांचे नावाचे बॅनर
चौकशी करा
आम आदमी पार्टीने या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले असून, 8 दिवसांच्या आत चौकशीचे आदेश देण्याची मागणी केली आहे. तसेच, या प्रकरणात सत्य समोर आणू नये म्हणून आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांना धमकी देण्यात आली आहे, याचाही निषेध करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. Aam Aadmi Party Chandrapur
गैरव्यवहाराचे ठळक मुद्दे:
- नाल्याच्या दोन्ही बाजूंना भिंत बांधणे आवश्यक असताना, केवळ एका बाजूला बांधकाम सुरू आहे.
- दुसऱ्या बाजूला हजारो नागरिकांची वस्ती असूनही भिंत बांधली जात नसल्याने पूरस्थितीचा धोका आहे.
- 95 लाख रुपये खर्च करून बांधली जाणारी भिंत, यापूर्वी शहरात कधीही बांधली गेली नाही.
- या प्रकल्पाला कोणाच्या मागणीनुसार मंजुरी देण्यात आली, याचा तपशील सार्वजनिक करावा.
- पाटबंधारे विभागाला इतकी मजबूत आणि महागडी भिंत उभारण्याची गरज का भासली, याचे उत्तर प्रशासनाने द्यावे.
आम आदमी पार्टीच्या मागण्या:
- या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.
- जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रशासनाने धमकी देणाऱ्यांची चौकशी करावी.
- आम आदमी पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी.
- आम आदमी पार्टीने प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, जर या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल.
जिल्हाधिकारी गौडा यांना निवेदन देताना आप जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, महानगर अध्यक्ष योगेश गोखरे, संघटन मंत्री संतोष बोपचे, मनीष राऊत, जिल्हा सचिव राजकुमार नगराळे, शेतकरी जिल्हाध्यक्ष दीपक बेरशेट्टीवार, महानगर महिला अध्यक्ष तबस्सूम शेख, कुणाल शेटे व विशाल बिरमवार उपस्थित होते.