Municipal Corporation loan । चंद्रपूर मनपा कर्जबाजारी होणार? कुणी केला हा दावा?

Municipal Corporation loan

Municipal Corporation loan : दिनांक 6 मार्च रोजी महानगरपालिकेच्या प्रशासकीय समितीची अर्थसंकल्पीय सभा पार पडली. यावेळी 2025-26 च्या अर्थसंकल्पा बाबत प्रसिद्धी माध्यमांद्वारे चंद्रपूरच्या जनतेला माहिती देताना आयुक्त विपिन पालीवाल यांनी हेतूपुरस्पर कर्जाबाबतची माहिती लपविल्याचा आरोप जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केला. मनपा जवळपास 250 कोटी रुपयांचे कर्ज घेणार असून प्रशासकीय समितीने तशा प्रकारचे ठराव यापूर्वीच मंजूर केले आहे. कर्जाची मागणी करणारे प्रस्ताव सुद्धा संबंधित विभागांना पाठविण्यात आले आहे. तरीसुद्धा याबाबतची माहिती लपविण्याचा धक्कादायक प्रकार देशमुख यांनी उघडकीस आणला. Financial crisis

जिल्ह्यातील वाळू माफियांवर शिवसेना शिंदे गट आक्रमक


शासनाच्या निधीतून शहरात अमृत पाणीपुरवठा योजना (Amrut Water Supply Scheme) टप्पा-2 (270 कोटी रु.),, भूमिगत मल:निसारण योजना(506 कोटी रु.), तसेच रामाळा तलाव पुनर्जीवन सांडपाणी प्रक्रिया केंद्र( 27 कोटी रु.) अशा तीन योजना मंजूर झाल्या आहेत. या योजनांसाठी शासनाकडून निधी मिळतो. मात्र कामाच्या किमतीच्या 33% हिस्सा मनपाला द्यावा लागतो. अमृत पाणीपुरवठा योजना टप्पा-2 करिता 85.791 कोटी रुपये, मल:निसारण योजने करिता 162.61 कोटी रुपये व रामाळा तलाव पुनर्जीवन सांडपाणी प्रक्रिया केंद्राला 9 कोटी रुपये मनपाचा हिस्सा म्हणून द्यावे लागणार आहेत.


अर्थसंकल्पा बद्दल माध्यमांना माहिती देताना आयुक्त पालीवाल (Commissioner Paliwal) यांनी रामाळा तलाव पुनर्जीवन सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी मनपाचा हिस्सा म्हणून 9 कोटी रुपये खनिज विकास निधीतून प्राप्त होणार असल्याची माहिती दिली. तसेच अमृत पाणीपुरवठा योजनेसाठी यावर्षी 70 कोटी व मल:निसारण योजनेसाठी 20 कोटी रुपये मनपाचा हिस्सा म्हणून तरतूद केल्याचे नमूद केले. मात्र यावर्षीचा हा निधी कसा उभा करणार याची माहिती हेतूपुरस्पर व अत्यंत हुशारीने नमूद करण्याचे टाळले. मल:निसारण व अमृत पाणीपुरवठा योजनेकरिता लागणारा एकूण अंदाजे 250 कोटी रुपये मनपाचा हिस्सा कसा देणार याबद्दलची माहिती देण्याचे सुद्धा त्यांनी टाळले. Chandrapur budget

चंद्रपूर मनपावर कर्जाचा भार वाढणार
आर्थिक स्थिती कमकुवत असल्यामुळे 250 कोटी रुपयांचा निधी देणे मनपाला शक्य नाही. त्यामुळे शहरी पायाभूत विकास निधीतून(UIDF) कर्ज घेऊन मनपा हा निधी उभारणार आहे. पुढील दोन वर्षानंतर व्याजासह या कर्जाची परतफेड करावी लागेल. कर्जाचा हा भार मनपाला भविष्यात जड जाणार. कर्जाचे हप्ते फेडणे मनपाला शक्य झाले नाही तर आर्थिक दिवाळखोरी निघेल.गरज व आर्थिक क्षमता नसताना मनपाने मर्जीतील नेते व कंत्राटदारांच्या हितासाठी कामाच्या किंमती फुगवून मल:निसारण व अमृत पाणीपुरवठा टप्पा दोनच्या योजनेला मंजुरी दिली.याचे परिणाम चंद्रपूरकरांना भविष्यात भोगावे लागतील, भविष्यातील विकास कामांवर याचे गंभीर परिणाम होतील.
…….. पप्पू देशमुख

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!