municipal water supply issues
“नळ आहेत, पण पाणी नाही! स्थानिकांचा मनपावर आक्रोश”
municipal water supply issues : चंद्रपूर : प्रभागातील अनेक भागांमध्ये विहिरी किंवा बोअरवेल असे पाण्याचे स्त्रोत आटल्याने उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच भिषण पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली.काही ठिकाणी मनपाच्या नळांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. तर काही ठिकाणी नळ पोहोचले पण पाणी पोहोचले नाही.त्यामुळे पाणीटंचाईची समस्या तीव्र झाली आहे. या पाणीटंचाईवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केली आहे. water shortage solutions
सरदार पटेल महाविद्यालयात संशोधनाविषयी राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळा संपन्न
देशमुख यांचे नेतृत्वात स्थानिक नागरिकांच्या एका शिष्टमंडळाने मनपाचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.शिष्टमंडळामध्ये जनविकास सेनेचे प्रफुल बैरम, मनिषा बोबडे यांचेसह स्थानिक नागरिक रवींद्र पेटकर,अशोक कातकर,रेखा पोलावार,रंजना पेटकर,अनिता शेंडे,रजनी पाचभाई,किरण कातकर,रूपा बैरम यांचा समावेश होता. poor water supply in cities
जगन्नाथ बाबा नगर मधिल साव ले-आऊट मध्ये मागील चार महिन्यांपासून नळाला पाणी येत नाही. याच भागात वासेकर ले-आउट व जगन्नाथ बाबा उद्यान परिसरात अनेक महिन्यांपासून अशुद्ध व अपुरा पाणीपुरवठा होत आहे.
गजानन महाराज मंदिर समोरील परिसरात मागील अनेक दिवसांपासून नळाला पाणी येत नाही. वडगाव जुनी वस्ती, मित्र नगर,वरोरा नाका चौक व लक्ष्मी नगरच्या अनेक भागांमध्ये अनियमित किंवा अपुरा पाणीपुरवठा होतो.
हवेली गार्डन परिसरामध्ये दोन वर्षांपूर्वी मनपा आयुक्त बिपीन पालीवाल यांनी स्वतः उपस्थित राहुल अमृत पाणीपुरवठा योजनेची चाचणी करून घेतली. दोन दिवस नळांना पाणी दिले. मात्र त्यानंतर दोन वर्षांपासून या भागात नळाला पाणी आले नाही.
आकाशवाणी जवळील चांद टेकडी, नागपूर रोडवरील ओम भवन परिसर, मित्र नगर लोकमान्य शाळेच्या जवळ व नागराज चौक,अपेक्षा नगर, विठ्ठल रुक्माई नगर, ठाकरे वाडी या ठिकाणी अमृत पाणीपुरवठा योजनेचे कनेक्शन देण्यात आलेले नाही. पंधरा दिवसात नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन अतिरिक्त आयुक्त पाटील यांनी यावेळी जनविकास सेनेच्या शिष्टमंडळाला दिले.