old pension scheme for teachers in Maharashtra | शिक्षकांसाठी आनंदाची बातमी! जुनी पेन्शन योजना लवकरच लागू होणार?

old pension scheme for teachers in Maharashtra

old pension scheme for teachers in Maharashtra : चंद्रपूर : जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत वित्त विभागाने दि. २ फेब्रुवारी २०२४ रोजी शासन निर्णय काढला. यावर शालेय शिक्षण विभागाने स्‍वतंत्र शासन निर्णय न काढल्याने शिक्षक – कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीची भावना असल्याने तात्काळ शालेय शिक्षण विभागाने स्‍वतंत्र शासन निर्णय काढून शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. old pension scheme latest news

चंद्रपूर जिल्हा पर्यटनाच्या बाबतीत क्रांती करणार – आमदार जोरगेवार

मुंबई येथे सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांची आमदार सुधाकर अडबाले यांनी भेट घेतली. यावेळी आयुक्त (शिक्षण) सचिंद्र प्रताप सिंह उपस्थित होते.

दि. ०१.११.२००५ पूर्वी पदभरती जाहिरात/अधिसूचना निर्गमित झालेल्‍या प्रकरणी शासन सेवेत दि. ०१.११.२००५ रोजी किंवा त्‍यानंतर रूजू झालेल्‍या शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली आहे. परंतु, जिल्हा परिषद /  खासगी अनुदानित / अंशतः अनुदानित शाळेत कार्यरत शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सदर शासन निर्णय लागू झालेला नाही. old pension scheme for government employees

त्यामुळे वित्त विभागाने दि. २ फेब्रुवारी २०२४ रोजी काढलेल्‍या दि. ०१.११.२००५ पूर्वी पदभरती जाहिरात/अधिसूचना निर्गमित झालेल्‍या प्रकरणी शासन सेवेत दि. ०१.११.२००५ रोजी किंवा त्‍यानंतर रूजू झालेल्‍या शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबतचा शालेय शिक्षण विभागाने स्‍वतंत्र शासन निर्णय काढण्याबाबत आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना निवेदन दिले. teacher pension scheme update

तसेच नगर परिषद भंडारा येथील बऱ्याच वर्षांपासून संच मान्यता दुरुस्ती प्रकरण व विदर्भातील ज्या संच मान्यता दुरुस्ती प्रकरणे प्रलंबित आहेत, त्या तात्काळ दुरुस्ती करण्याबाबत आमदार सुधाकर अडबाले यांनी आयुक्त (शिक्षण) सचिंद्र प्रताप सिंह यांच्याशी सकारात्मक चर्चा केली.

Sharing Is Caring:

2 thoughts on “old pension scheme for teachers in Maharashtra | शिक्षकांसाठी आनंदाची बातमी! जुनी पेन्शन योजना लवकरच लागू होणार?”

  1. 2025पयँत काम करत आहे नतर च्या सर्व कमँचारी याच्यावर अन्याय होत आहे

    Reply
  2. Please send me the 10/20/30/ Ashwathi pragati yojana which is. granted in cabinet ministers meeting (11/03/2024)and 53 cr and some amount for secondary teacher please give me the education G R. And commutation amount 20 lacs GR , I am retired in oct 2019

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!