Online cricket betting arrest । क्रिकेट बेटिंगचा भांडाफोड – ३ लाख रोख आणि ३८ लाखांचे डिजिटल कॉइन जप्त

Online cricket betting arrest

Online cricket betting arrest : नागपूरनंतर सर्वात जास्त क्रिकेट सट्टा हा चंद्रपुरात खेळल्या व लावला जातो अश्यातच स्थानिक गुन्हे शाखेने याप्रकरणी धरपकड मोहीम सुरु केली आहे. काही दिवसांपूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात व्यंकटेश हॉटेलमध्ये क्रिकेट बेटिंग घेताना तिघांना अटक करण्यात आली होती. Illegal cricket betting case

म्हातारदेवी घुग्गुस मध्ये राहणारा २६ वर्षीय युवक अंशुल रामबाबू रॉय ला स्थानिक गुन्हे शाखेने १६ मार्च रोजी लिजेंड लीग पाध्ये खेळल्या गेलेल्या भारत-वेस्टइंडीज च्या अंतिम सामन्यात क्रिकेट बेटिंग घेताना अटक केली.

थेट मुलाखत आणि थेट नोकरी, चंद्रपुरात २९ मार्चला भव्य रोजगार मेळावा

चॅम्पियन्स ट्रॉफी नंतर लिजेंड लीग क्रिकेट सामन्यांना सुरुवात झाली होती, यावर क्रिकेट बेटिंग मोठ्या प्रमाणात सुरु झाली. चंद्रपूर शहरात क्रिकेट सट्टेबाज यांच्यावर कारवाई झाल्यावर पोलिसांच्या नजरा या सट्टेबाजांवर होत्या, अश्यातच स्थानिक गुन्हे शाखेला क्रिकेट बेटिंगबाबत गोपनीय माहिती प्राप्त झाली. माहितीच्या आधारे पथक घुग्गुस मधील म्हातारदेवी या गावात धडकले. Cricket betting police raid

Illegal cricket betting case

चिंतामणी कॉलेजजवळ राहणारा २६ वर्षीय अंशुल रामबाबू रॉय हा आपल्या घरी मोबाईलद्वारे ऑनलाईन पद्धतीने क्रिकेट सामन्यादरम्यान बेटिंग घेत होता. पोलिसांनी धाड मारताच आरोपीची घाबरगुंडी उडाली. यावेळी kingexch९.com या आयडीमध्ये ३८ लाख रुपयांचे डिजिटल कॉइन सोबतच १ मोबाईल व रोख ३ लाख रुपये असा एकूण ४२ लक्ष रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला.

आरोपीवर महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यात क्रिकेट सट्टेबाजांचे नेटवर्क उध्वस्त करण्याची मोहीम सध्या स्थानिक गुन्हे शाखेने आपल्या हातात घेतली असून लवकरच या धंद्यातील वस्ताद पोलिसांच्या ताब्यात असतील.

घुग्गुस मधील यशस्वी कारवाई हि पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोउपनि मधुकर सामलवार, पोउपनि सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, प्रशांत नागोसे, किशोर वाकाटे, शशांक बदामवार, अमोल सावे, मिलिंद टेकाम यांनी केली.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!