police raid on liquor transport । 12 लाखांच्या दारू तस्करीत कोण आहे ‘बिग बॉस’? पोलिसांचा शोध सुरू

police raid on liquor transport

police raid on liquor transport : गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असताना त्याठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात दारूचा पुरवठा होत आहे, अवैध दारू पुरवठ्याचे मूल, सावली व गोंडपिपरी हे मूळ केंद्र आहे. आणि दारूचा पुरवठा आजपासून नाहीतर अनेक वर्षांपासून बेधडकपणे सुरु आहे. अजूनही या दारू पुरवठ्यावर ठोस अशी कारवाई झालेली नाही. alcohol smuggling routes in Maharashtra

शिवद्रोही प्रशांत कोरटकर ला चंद्रपुरात कुणी मदत केली? त्यांना अटक करा

२७ मार्च रोजी मूल पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली कि चारचाकी वाहनातून दारूची अवैध वाहतूक होत आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी भूजला ते बेंबाळ या मार्गावर नाकाबंदी केली.

त्यावेळी बेंबाळ कडून चांदापूर फाट्याकडे चारचाकी वाहन क्रमांक mh ३४ cd ७११६ हे येताना दिसले, वाहनाला थांबवित झडती घेतली असता लाखो रुपयांची विदेशी दारू सदर वाहनात आढळली पोलिसांनी वाहन चालक ४० वर्षीय खुशाल भैयाजी बांगडे ला ताब्यात घेत विचारपूस केली, त्याने ह्या दारूच्या अवैध वाहतुकीमागे बल्लारपूर येथील पवन जयस्वाल व व्याहाळ येथील राज बिअर बारचे संचालक निखिल मंडलवार यांचे नावे सांगितली. पोलिसांनी या कारवाईत वाहनसहित एकूण १२ लाख ९१ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. foreign liquor seized Maharashtra

चंद्रपुरातील संडे मार्केट बंद

पोलिसानी इतर २ आरोपींचा शोध घेणे सुरु केले आहे. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे व परिविक्षाधीन अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली जमीर खान पठाण व नरेश कोडापे यांनी केली.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!