Pradhan Mantri Awas Yojana subsidy increase
Pradhan Mantri Awas Yojana subsidy increase : सध्या लोकसभेचे अर्थसंकल्पाचे दुसऱ्या टप्प्यातील अधिवेशन 10 मार्च पासून सुरु झाले असून खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विविध प्रश्नांच्या माध्यमातून लोकसभा क्षेत्रातील नागरीकांच्या समस्यांना संसदेत मांडून समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करीत आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात 2 दिवस उष्ण लाटेचा यलो अलर्ट
अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या दुसऱ्या टप्प्यात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानात वाढ करण्याची मागणी संसदेत प्रश्नाद्वारे केली आहे. सध्या महागाई चा दर वाढला असून प्रत्येक सामानांच्या किंमती वाढल्या असून केंद्र सरकार कडून मिळणारे अनुदान हे अपूरे असल्याचे खासदार धानोरकर यांनी केंद्र सरकार ला सांगितले. PMAY latest news today
व्हेज बिर्याणी खायची आहे? तर ही बातमी वाचा
आवास योजने करीता किमान 5 लक्ष रुपये अनुदान देण्याची मागणी देखील खासदार धानोरकर यांनी केली आहे. तसेच, शहरी व ग्रामीण आवास योजने अंतर्गत देणाऱ्या रकमेत कुठलेही कमी-जास्त पणा न ठेवता समान निधी देण्यात यावा अशी देखील मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे.
या संदर्भात सरकार ने खासदार प्रतिभा धानोरकर यांना यासंदर्भात पाठवलेल्या उत्तरातून भविष्यात सरकार या वर विचार करुन निधी वाढी संदर्भात निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे. सदर निर्णय झाल्यास ग्रामीण व शहरी भागातील नागरीकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत होणार आहे.