Raju Reddy Congress Leader News
Raju Reddy Congress Leader News : चंद्रपूर: घुग्गुस येथील काँग्रेस शहराध्यक्ष राजू रेड्डी यांच्या घरी 9 मार्च 2025 रोजी गोळीबार झाल्याची अफवा पसरली होती. मात्र, पोलिसांना प्राथमिक तपासात असे कोणतेही पुरावे सापडले नसल्याचे स्पष्ट केले आहे.
घटना कशी उलगडली?
9 मार्च रोजी रात्री चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यानंतर भारताच्या विजयाचा जल्लोष सुरू असतानाच, घुग्गुसमध्ये राजू रेड्डी यांच्या घरी गोळीबार झाला अशी बातमी पसरली. माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव, आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे घटनास्थळी दाखल झाले होते. ghuggus shooting incident
2 किलोमीटर वर पोलीस स्टेशन तरीसुद्धा वाळू तस्करी जोमात
गोळीबाराच्या अफवेचा पर्दाफाश
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, पहिल्या मजल्यावर किरायाने राहणाऱ्या अनुपसिंग चंदेल यांच्या पोर्चमध्ये रिकाम्या काडतुसाचा केस आढळून आला. मात्र, सीसीटीव्ही फुटेज किंवा इतर कोणत्याही पुराव्यांमध्ये गोळीबार झाल्याचे संकेत आढळले नाहीत. gunfire news in maharashtra
पोलिसांचा पुढील तपास सुरू
भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी, रिकामा काडतुस केस तिथं कसा आला? याचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे. पोलीस अधिक्षकांनी जनतेला गोळीबारासंदर्भात अफवा न पसरवण्याचे आवाहन केले आहे.