road accident news in Chandrapur । चड्डा ट्रान्सपोर्टच्या ट्रकने घेतला वाहकाचा जीव

road accident news in Chandrapur । चड्डा ट्रान्सपोर्टच्या ट्रकने घेतला वाहकाचा जीव

road accident news in Chandrapur

आरटीओची डोळेझाक, ट्रान्सपोर्टची मुजोरी

road accident news in Chandrapur : चंद्रपूर शहरातील रस्ते अरुंद असल्याने नागरिकांना वाहतुकीस अनेक समस्यांचा सामना करावा लागतो, शहरापेक्षा भयावह स्थिती हि नागपूर रोडवरील आहे, या रस्त्यावर मोठ्या ट्रान्सपोर्टने आपला ठिय्या मांडलेला दिसून येतो. यामुळे १५ मार्च रोजी मध्यरात्री हायटेक कॉलेज ऑफ फार्मसी समोर नागपूर वरून चंद्रपूरकडे येणाऱ्या बस ची धडक रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्र्क ला दिली या धडकेत बस मधील वाहक ठार झाला तर १३ जण गंभीर जखमी झाले. Nagpur to Chandrapur road accident

माजरी वेकोलि मध्ये महाराष्ट्र सुरक्षा रक्षकांना चोरी करताना अटक

कसा झाला अपघात?

राज्य परिवहन विभागाची बस क्रमांक MH14 KA 8587 नागपूरवरून चंद्रपूरच्या दिशेने येत होती. यावेळी रस्त्यावर उभा असलेला चड्डा कंपनीचा ट्र्क क्रमांक MH31 CA 3171 ला बसने जोरात धडक दिली. धडक इतकी जोरदार होती कि बस चा समोरील भाग चक्काचूर झाला.

बसचालकाने याबाबत माहिती दिली कि राखेच्या धुळीमुळे रस्त्यावर पुढे काही दिसले नाही, त्यामुळे अचानक उभ्या ट्रकला धडक बसली.

अपघातानंतरची परिस्थिती काय होती?

मध्यरात्री अपघात झाला अशी माहिती पोलीस व राज्य परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना प्राप्त झाली, त्यांनतर घटनास्थळी पोलीस व राज्य परिवहन विभागाचे अधिकारी दाखल झाले, प्रवाशांना पोलीस नागरिकांच्या मदतीने बसमधून बाहेर काढत रुग्णवाहिकेत बसवीत होते. बसचे चालक दत्तात्रय इंगोले यांना नागरिकांनी बाहेर काढले. बसचे वाहक संदीप वनकर ट्र्क व बसच्या सीट्मध्ये फसून गेले होते. त्यांच्या मागे बसलेले एसटी महामंडळाचे कर्मचारी सिद्धार्थ मडामे या दोघांना बसचा पत्रा कापून बाहेर काढत होते.

वाहक संदीप वनकर यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यासह एकूण १० ते १५ जखमी झाल्याची माहिती आहे. Chandrapur bus accident today

ट्रान्सपोर्ट धारकांना रस्ते गहाण

चंद्रपूर शहर व महामार्गावर चड्डा व डीएनआर ट्रान्सपोर्ट धारकांनी अक्षरक्षा कब्जा केल्याचे दिसून येते. विशेष बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी ५०० रुपयांची लाच प्रकरणी प्रकाशझोतात आलेल्या RTO विभाग यावर डोळेझाक करून आहे. आरटीओ विभाग व ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांचे साटेलोटे असल्याने कारवाई होताना दिसून येत नाही याचा परिणाम अश्या अपघाताच्या घटनेत सामान्य नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो.

रस्त्यावर ट्र्क उभा ठेवल्यास त्याला झाडाची फांदी, रेडियम लावण्याचा नियम आहे मात्र आपलं कुणीही काही बिघडवू शकत नाही अशी वृत्ती ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांची असल्याने ते मुजोरीवर उतरतात.

एसटी महामंडळाने याबाबत पडोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देत चड्डा ट्रान्स्पोर्टचे चालक राजन बनवारी यादव यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार दिली आहे. ST bus accident in Maharashtra

Sharing Is Caring:

Leave a Comment