TB free villages India
TB free villages India : क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील 208 ग्रामपंचायती क्षयरोग मुक्त घोषित करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात 100 दिवस क्षयरोग दूरीकरण मोहीम 7 डिसेंबर 2024 पासून सुरू झाली असून आज जागतिक क्षयरोग दिनानिमित्त 24 मार्च रोजी या मोहिमेचा समारोप करण्यात आला. Chandrapur TB program
चंद्रपूर मनपाने गांधी चौकात प्रसिद्ध केली थकबाकीदारांची नावे
प्रियदर्शनी सभागृह येथे पार पडलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ललीतकुमार पटले, अतिरीक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. भास्कर सोनारकर, सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. संदीप गेडाम, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रकाश साठे, डॉ. सौरभ राजुरकर, डॉ. वैभव आगलावे आदी उपस्थित होते.
जागतिक क्षयरोग दिनानिमित्त 15 ते 31 मार्च पर्यंत क्षयरोग पंधरवाडा साजरा करण्यात येत असून जिल्हा स्तरावर क्षयरोग जनजागृती करण्याकरीता विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन म्हणाले, आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा आहे. गावपातळीवरील लोकांच्या सहकार्याशिवाय टीबी मुक्त ग्रामपंचायत करणे शक्य झाले नसते. World TB Day 2025
100 दिवस मोहिमेदरम्यान 4 लक्ष 81 हजार 455 अतिजोखिमेच्या व्यक्तींचे क्षयरोगाबाबत पडताळणी करण्यात आली. 3241 निक्षय शिबीर घेण्यात आले व 10886 लोकांची नॅट तपासणी करण्यात आली. 25059 व्यक्तींचे छातीचे एक्स- रे करण्यात आले असून 1114 नविन क्षयरुग्ण शोधून त्यांना औषधोपचार सुरू करण्यात आला.
जनजागृती रॅलीचे आयोजन : जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्हा क्षयरोग केंद्र चंद्रपूर येथून क्षयरोग जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. सदर रॅलीमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय व प्रभादेवी नर्सिंग महाविद्यालय येथील विद्यार्थी, वैद्यकीय अधिकारी, सेवाभावी संस्थाचे पदाधिकारी व जिल्हा क्षयरोग केंद्र, येथील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. Rural TB eradication
उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सत्कार : शहरी भागात उकृष्ट टीबी नोटीफिकेशन केल्याबद्दल डॉ. सौरभ राजुरकर, डॉ. शरयू पाझारे, डॉ. आनंद बेर्डले, डॉ. प्रविण पंत, डॉ. अमरीप बुक्काबार यांना सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच डॉ. मंगेश भरडकर यांनी संक्षयित क्षयरुग्णांची माहिती दिल्याबद्ल तसेच प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत स्टील ऑथरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, मॉउंट कारमेल कॉन्व्हेट हायस्कूल, राजीव रतन हॉस्पीटल, घुग्घस, डॉ. कोमल मुनेश्वर, अमित जयस्वाल, नदीम कुरेशी या सर्वांनी गरजू क्षयरुग्णांना पोषण आहार किट वितरीत केल्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला.
विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस : क्षयरोगाची जनजागृती करण्याकरीता शहरी व ग्रामीण भागात चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच स्पर्धेत यशस्वी होणा-या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन हेमंत महाजन व अश्विनी चांदेकर यांनी केले. आभार डॉ. माधुरी टेंभे यांनी मानले.