Tiger attack in Mul MIDC | मूल एमआयडीसी परिसरात वाघाचा थरार: मेंढपाळाचा बळी

Tiger attack in Mul MIDC

Tiger attack in Mul MIDC : मूल तालुक्यातील एमआयडीसी परिसरात गुरुवारी मध्यरात्री एका वाघाने शेळ्या-मेंढ्यांच्या कळपावर हल्ला चढवून मेंढपाळ निलेश दुर्गा कोरेवार (रा. चांदली बुज., ता. सावली) याला ठार केले. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

लाच प्रकरणी चंद्रपुरातील महिला सरपंच व ग्रामसेवकाला अटक

चिमढा शेतशिवारात केलझरकर यांच्या शेतात निलेश कोरेवार आणि त्याचा भाऊ योगेश कोरेवार हे शेळ्या-मेंढ्यांचा कळप घेऊन मुक्कामी होते. रात्री 11.30 च्या सुमारास वाघाने हल्ला करून निलेशला ओढत नेले. Man killed by tiger in Chandrapur

घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांनी पथकासह शोधमोहीम सुरू केली. शोधमोहिमेदरम्यान राजुरी कंपनीच्या मागील जंगलात निलेशचा मृतदेह आढळून आला. Human-wildlife conflict Maharashtra

2025 मध्ये मानव-वन्यजीव संघर्षातील हा सहावा बळी आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाने परिसरात गस्त वाढवली आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!