Tiger human conflict India
Tiger human conflict India : मूल: शेतातील मोकळ्या जागेत मेंढ्यांच्या कळपाजवळ झोपलेल्या मेंढपाळावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना मूल तालुक्यातील कोसंबी मार्गावर शनिवारी पहाटे 4.30 वाजताच्या सुमारास घडली. मृत मेंढपाळाचे नाव मल्लाजी पोचूजी येगावार (वय 68, रा. वार्ड क्रमांक 1, मूल) असे आहे. सलग दुसऱ्या दिवशी मेंढपाळावर वाघाने हल्ला केल्याने या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. Shepherd killed by tiger in Mul
हल्ल्याचा घटनाक्रम:
मल्लाजी पोचूजी येगावार आपल्या नातवासोबत शेतातील मोकळ्या जागेत झोपले होते. बाजूलाच मेंढ्यांचा कळप होता. धान पीक काढल्यानंतर शेतकऱ्यांकडून मेंढ्यांचे कळप शेतात सोडले जातात, मात्र यावेळी वाघाचा हल्ला झाला. पहाटे वाघाने अचानक झोपेत असलेल्या मल्लाजी यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना फरफटत एक किलोमीटर अंतरावर कोसंबी मार्गावरील नाल्याजवळ नेले. Maharashtra tiger attack cases
छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत समाज माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट, चिमुरमध्ये तणाव
सकाळी मल्लाजी यांचा नातू जागा झाल्यावर आजोबा गायब असल्याचे लक्षात आले. त्याने घरी जाऊन कुटुंबाला माहिती दिली. वनविभागाला घटनेची सूचना देण्यात आली आणि शोध मोहिमेनंतर कोसंबी नाल्याजवळ झुडपात मृतदेह आढळून आला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मूल उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.
मेंढपाळांमध्ये भीतीचे वातावरण
सलग दुसऱ्या दिवशी वाघाने मेंढपाळाचा बळी घेतल्याने स्थानिक नागरिक, शेतकरी आणि मेंढपाळांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी शेतात झोपणे धोकादायक ठरत असल्याने मेंढपाळांच्या रोजगारावर टाच येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
वाघाच्या हल्ल्यांमध्ये वाढ
चंद्रपूर जिल्ह्यात या वर्षात आतापर्यंत वाघाच्या हल्ल्यांत ७ जणांचा बळी गेला आहे. दोन दिवसांत दोन मेंढपाळ ठार झाल्यामुळे वनविभागावर त्वरित उपाययोजना करण्याचा दबाव वाढला आहे. घटनेनंतर प्रादेशिक वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. Chandrapur tiger conservation issue
वनविभागाकडून काय उपाय?
वाघाच्या वाढत्या हल्ल्यांमुळे वनविभागाने तातडीने संरक्षण उपाययोजना करण्याची गरज आहे. शेतकरी व मेंढपाळांना सुरक्षित राहण्यासाठी मार्गदर्शन करण्यासह वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी उपाययोजना केली जावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.