Traffic congestion due to road work
Traffic congestion due to road work : चंद्रपूर शहरात मागील २ महिन्यापासून अमृत २.० व मलनिःस्सारण प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली मात्र कसलेही नियोजन न करता रस्त्याचे खोदकाम सुरु केले, मात्र या खोदकामामुळे शहरात सर्वत्र धुळीचे वातावरण निर्माण झाले. वाहतूक व्यवस्था अक्षरक्षा खोळंबली. Chandrapur Traffic
बिहारची बंदूक, चंद्रपूरचे तीन गुन्हेगार
आधीच प्रदूषणाची झळ सोसणाऱ्या चंद्रपूरकरांना रस्त्यावरील धुळीचे प्रदूषण सोसावे लागत आहे. शहरातील मुख्य मार्ग कस्तुरबा व महात्मा गांधी मार्ग खोदण्यात आला आहे, नागरिकांना शहरातून जात असताना चांगलीच कसरत करावी लागत आहे.
सदर काम सुरु होण्यापूर्वी वाहतुकीचे व प्रदूषणाचे काय होणार याच कसलेही नियोजन मनपाने केलं नसल्याचं चित्र शहरातील वातावरण बघून निदर्शनास येते. जिल्हा परिषद मार्ग ते गिरनार चौक या मार्गावरून जाताना नागरिकांचे चेहरे लाल होत आहे. गिरनार चौकातून महात्मा गांधी मार्गावर गेल्यास थेट प्रियदर्शिनी चौकापर्यंत ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवले आहे. Dust pollution from road construction
या कारणामुळे चंद्रपुरातील संडे मार्केट बंद
सदर कामापूर्वी चंद्रपूर वाहतूक विभागाने वाहतुकीचा खोळंबा होणार नाही याच नियोजन का केलं नाही असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला आहे. चंद्रपूर शहरातील मार्ग हे अरुंद आहे, विशेष म्हणजे विविध ठिकाणी अतिक्रमण सुद्धा आहे, कामापूर्वी मनपाने अतिक्रमण काढले असते तर नागरिकांना या मार्गावरून जाताना त्रास झाला नसता.
शहरातील जटपुरा गेट ते जिल्हा परिषद मुख्यालयाच्या रस्त्यावर वारंवार ट्रॅफिक जॅम होत असून वाहतूकदारांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. दररोज या जॅम मध्ये ४ ते ५ रुग्णवाहिका अडकत आहे, नागरिक वाहतुकीच्या नियमन न जुमानता आपली वाट काढतात मात्र याना नियम सांगणार वाहतूक विभाग यावर काही उपाययोजना करताना कुठेही दिसत नाही आहे.
एकदम खरी बातमी आहे. चंद्रपूर शहरातील या रस्त्यावर गाडी चालवने खूपच त्रासदायक झाल आहे. एका बाजूला धुळ प्रदूषण आणि दुसर्या बाजूला रस्त्यावरील खड्डे. मला अस वाटतेय की मनपा च्या उच्च अधिकार्यांनी एक सर्वसामान्य माणूस म्हणून या रस्त्यावरून चालून बघायला पाहिजे आणी पब्लीक ला होत असलेल्या त्रासाचा आढावा घेतला पाहिजे. कुठलेही काम करताना पब्लिकची गैरसोय होऊ नये यावर प्रत्येक कर्मचाऱ्यांनी विचार केला पाहिजे. Public safety first. एखाद्या व्यक्तीला जर दमाचा त्रास असेल आणि चुकून तो व्यक्ती या रस्त्यावरून आपली वाट काढत असेल तर तो व्यक्ती आपल्या घरापर्यंत पोहोचेल की नाही याची गॅरंटी नाही. शहरातील विकासाला साधारणतः कोणाचा विरोध नसतो. पण याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही पब्लीकच्या आरोग्यशी खेळा. एक सिटीजन.