worker fakes assault to steal employers money । चंद्रपुरात डोळ्यात मिरची पावडर टाकत १७ लाख रुपये पळविले पण….

worker fakes assault to steal employers money

worker fakes assault to steal employers money : चंद्रपूर शहरात गुरुवारी २० मार्चला संध्याकाळी शहरातील स्क्रॅप व्यापारी आणि पोलिसांसमोर एक धक्कादायक प्रकार समोर आला, जेव्हा व्यापाऱ्याच्या नौकराने स्वतःवर मिरची पूड टाकून १७ लाख रुपये लुटल्याचा बनाव रचला. employee staged robbery

शहर पोलिसांनी सखोल तपास आणि नौकराची कसून चौकशी केल्यानंतर, त्याने अखेर कबूल केले की हे सर्व पैसे हडप करण्याच्या उद्देशाने त्यानेच केले होते.

जुनी पेन्शन योजना लागू होणार? आमदार अडबाले यांचा पाठपुरावा

घटना कशी घडली?

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील प्रसिद्ध स्क्रॅप व्यापारी हबीब दाऊद मेमन यांनी आपल्या नौकर रफिक शेख याला १७ लाख रुपये घरपोच करण्यासाठी दिले. मात्र, रफिक शेखने हे पैसे घरी न नेता, घुटकाला वॉर्ड येथील आंबेकर ले-आऊट परिसरात स्वतःवरच मिरची पूड फेकून अज्ञात व्यक्तींनी पैसे लुटल्याचा बनाव केला.

यानंतर, घाबरलेल्या नौकराने आपल्या मालकाला फोन करून लुटीची माहिती दिली. हबीब दाऊद मेमन यांनी तातडीने शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. worker fakes own assault for money

पोलिसांचा तपास आणि सत्य उघड

शहर पोलिसांनी त्वरित कारवाई करत तपास सुरू केला. संशयास्पद वाटत असल्याने पोलिसांनी नौकराची कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान, नौकर रफिक शेखने अखेर कबुली दिली की, १७ लाख रुपये लाटण्यासाठी त्यानेच हा बनाव केला होता.

या घटनेबाबत अधिक तपास सुरू असून, पोलिसांची कारवाई सुरू आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!