Aaple Sarkar portal downtime
महाआयटीच्या देखभाल आणि अद्ययावत कामासाठी राज्यातील नागरिकांना मिळणाऱ्या शासकीय सेवा तात्पुरत्या बंद; ग्रामपंचायत, सेतू केंद्र, आणि पोर्टलवर अवलंबून नागरिकांनी ही महत्त्वाची पूर्वसूचना लक्षात घ्यावी.
Aaple Sarkar portal downtime : चंद्रपूर, दि. 9 एप्रिल : राज्य शासनाच्या विविध विभागांच्या सेवा ‘आपले सरकार’ पोर्टलवरून प्रदान केल्या जातात. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) यांनी हे पोर्टल विकसित केले आहे.
असंख्य युवकांचा कांग्रेसमध्ये प्रवेश
या पोर्टलची नियमित देखभाल आणि तांत्रिक अद्यतनासाठी दिनांक 10 एप्रिल ते 14 एप्रिल 2025 असे पाच दिवस या पोर्टलची सेवा बंद राहील. या काळात कार्यालयीन कामकाजाचा फक्त एक दिवस वगळता उर्वरित सर्व दिवस सार्वजनिक सुट्टीचे आहेत. Aaple Sarkar services unavailable
राज्यातील सर्वसामान्य नागरिक, ग्रामीण आणि शहरी भागातील ‘आपले सरकार’ केंद्र चालक, ‘सेतू’ केंद्र चालक, संबंधित ग्रामपंचायती आणि शासकीय कर्मचारी यांनी या पूर्वसूचनेची नोंद घ्यावी. या कालावधीत ‘आपले सरकार’ सेवा पोर्टलमार्फत दिली जाणारी कोणतीही सेवा उपलब्ध असणार नाही, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.