Ambedkar Jayanti 2025 Chandrapur
Ambedkar Jayanti 2025 Chandrapur : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासन, चंद्रपूर महानगरपालिका, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा कीडा संकुल येथून 13 एप्रिल 2025 रोजी ला सकाळी 6.30 वाजता जयभीम पदयात्रा निघणार आहे. Jay Bhim Padayatra 2025
चंद्रपुर जिल्हा परिषदेत लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई
या पदयात्रेचा मार्ग जिल्हा क्रीडा संकूल- डॉ. आंबेडकर महाविद्यालय चौक-पवनसूत दवा बाजार-पाण्याची टाकी, परत वरोरा नाका चौक-जिल्हा क्रीडा संकूल याप्रमाणे असेल. याप्रसंगी चंद्रपूर जिल्हयातील सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुक्त चंद्रपूर शहर महानगरपालिका यांच्यासह नागरिकांची उपस्थिती राहणार आहे.
डॉ. बाबासाहेबांनी भारताला सर्वोत्तम राज्यघटना दिली. त्यांच्या दूरदष्टीचा व कार्याचा गौरव करण्याकरीता जास्तीत जास्त नागरीक, विविध सामाजिक संघटना, क्रीडा मंडळे, शैक्षणिक संस्था, क्रीडा शिक्षक, खेळाडू व विद्यार्थ्यांनी स्वयंस्फुर्तीने या रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी केले आहे.