Ambedkar thoughts for students
भारत सरकारने जाहीर केलेल्या New Education Policy 2025 अंतर्गत देशातील शालेय अभ्यासक्रमात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र लिहून एक महत्त्वाची मागणी केली आहे — इयत्ता 5 वी ते 10 वी च्या social studies syllabus मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार (Ambedkar Thoughts), छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य व प्रेरणादायी शिकवण (Shivaji Maharaj Teachings) तसेच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे योगदान यांचा समावेश करण्यात यावा. त्याचप्रमाणे, भारतीय संविधानातील (Indian Constitution) काही महत्त्वाचे घटक शिकवले गेल्यास विद्यार्थ्यांना आपले अधिकार आणि कर्तव्य (fundamental rights and duties) यांची स्पष्ट जाणीव होईल. भारताच्या थोर महापुरुषांचे कार्य व संघर्षाची गाथा अभ्यासक्रमात आल्यास, नव्या पिढीला प्रेरणादायी आदर्श लाभतील आणि शिक्षण अधिक मूल्याधिष्ठित होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
Ambedkar thoughts for students : देशात नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची सुरुवात 2025-26 या कालावधीत होणार असून सदर शैक्षणिक धोरणातील वर्ग 5 ते 10वी च्या अभ्यासक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, कार्य व संविधानातील काही घटक तसेच, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य विचार यांचा अभ्यासक्रमात समावेश करण्याची मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेन्द्र प्रधान यांचे कडे पत्राद्वारे केली आहे. New education policy India 2025
चंद्रपूर महानगरपालिका झाली डिजिटल
छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य विचार तसेच, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य नव्या पिढीला प्रेरणादायी ठरणार असून नविन शैक्षणिक धोरणातील अभ्यासक्रमात भारतातील थोर महापुरुषांच्या विचार व कार्याचा अभ्यासक्रमात समावेश केल्यास नव्या पिढींला योग्य दिशा मिळणार असल्याचे मत खासदार धानोरकर यांनी केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेन्द्र प्रधान यांना पाठविलेल्या पत्रात आपले मत व्यक्त केले आहे. Importance of Constitution in education
संविधानातील काही घटक अभ्यासक्रमात समाविष्ठ केल्यास आपले अधिकार व कर्तव्य याची जाणीव नव्या पिढीला होणार असल्याने खासदार धानोरकर यांनी ही मागणी केली आहे. भारतातील थोर महापुरुषांचे कार्य व संघर्षाची गाथा नव्या पिढीला माहिती व्हावी याकरीता सामाजिक शास्त्रातील वर्ग 5 ते 10 वी च्या अभ्यासक्रमात याचा समावेश करण्याची मागणी खासदार धानोरकर यांनी केली आहे. यामुळे नव्या पिढीला थोर महापुरुषांचा प्रेरणादायी संघर्ष अभ्यासक्रमातून अनुभवता येणार असल्याचे मत खासदार धानोरकर यांनी व्यक्त केले आहे. या संदर्भात केंद्रीय शिक्षा मंत्री काय निर्णय घेणार हे देखील महत्वाचे ठरणार आहे.