Bhadravati sand mining news
Bhadravati sand mining news : भद्रावती तालुक्यातील काही घाटातून अवैधरित्या रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टर व टिप्पर ची माहिती प्रशासनाला येथील खबऱ्या देऊन त्या माध्यमातून त्या वाहनावर कारवाई केली जाते त्यानंतर हाच खबऱ्या या घाटातून दररोज मोठ्या प्रमाणात रेती तस्करी करत असल्याचा प्रकार सुरू आहे.
चंद्रपुरात सुगंधित तंबाखूचा साठा जप्त, वसीम, जयसुख व गुप्ता अजूनही मोकाट
चंद्रपूर, वरोरा , भद्रावती पोलिसांचे काही अधिकारी महसूल विभागाचे अधिकारी , वन विभागाचे काही अधिकारी यांच्यासोबत या खबऱ्याने आपली चांगलीच ओळख निर्माण केली आहे मी उच्चशिक्षित व उद्योजक आहे असे भासवून हा प्रशासकीय अधिकाऱ्यांशी जवळीक साधतो त्यानंतर हा सगळा प्रकार करतो. sand mafia in Maharashtra
गेल्या कित्येक महिन्यापासून हा पिपरी घाटातून गवराळा मार्गे चारगाव घाटातून विजासन मार्गे रात्रंदिवस बिनधास्त ट्रॅक्टर व टिप्पर द्वारे रेती तस्करी करतो याच्यावर प्रशासनाने आतापर्यंत एकही कारवाई केली नाही तसेच या खबऱ्याशी जे रेती तस्कर जोडले आहे त्यांनाही प्रशासनाचे अभय आहे जे रेती तस्कर याची ऐकत नाहीत त्यांची खबर प्रशासनाला देऊन त्यांच्यावर कारवाई करण्यास भाग पाडत आहे.
तालुक्यातील पिपरी व चारगाव घाट या रेती तस्करांनी पूर्णपणे शासनाच्या करोडोच्या महसूल बुडविल आहे, पिपरी घाट पोकळ करून ठेवला आहे मात्र प्रशासन छोट्या छोट्या कारवाया करताना दिसत आहे मात्र या प्रकारामुळे मोठ्या तस्करांना यांचा आशीर्वाद असल्याचे दिसून येत आहे.