bjp foundation day chandrapur । चंद्रपुरात भाजप स्थापना दिन, ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा होणार सन्मान!

bjp foundation day chandrapur

bjp foundation day chandrapur : भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिन उद्या, रविवार 6 एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टी चंद्रपूर विधानसभेच्या वतीने विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने रविवारी दुपारी 12 वाजता श्री माता कन्यका सभागृहात भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आज आमदार किशोर जोरगेवार यांच्या अध्यक्षतेखाली जैन भवन येथील कार्यालयात नियोजन बैठक पार पडली. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्खेने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. bjp sthapana din maharashtra

चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा वाघाचा हल्ला, शेतकरी ठार

या बैठकीला भाजपाचे माजी महानगराध्यक्ष दशरथसिंग ठाकूर, ज्येष्ठ नेते विजय राऊत, भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष रघुवीर अहिर, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, माजी नगरसेवक प्रदीप किरमे, माजी नगरसेवक देवानंद वाढई, माजी नगर सेविका कल्पना बबूलकर, माजी नगर सेविका छबु वैरागडे, माजी नगर सेविका वंदना तिखे, राजेंद्र अडपेवार, अरुण तिखे, राजेंद्र खांडेकर, गणेश गेडाम, पुरुषोत्तम राउत, प्रविण गिलबिले, वंदना हातगावकर, सुरेश तालेवार, वामन आमटे, प्रज्ञा बोरगमवार, विठ्ठलराव डुकरे, आमीन शेख, शेखर शेट्टी, रज्जन ठाकूर, बाळू कोलनकर, मंजुश्री कासनगोट्टूवार, सविता दंढारे, अमोल शेंडे, मृग्धा खाडे, रशिद हुसेन, नकुल वासमवार, करणसिंग बैस, सपना नामपल्लीवार, निलिमा वनकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. bjp chandrapur meeting

या कार्यक्रमादरम्यान पक्षासाठी निष्ठेने आणि समर्पण भावनेने कार्य करणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार करून त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रमात पक्षाचे अनेक मान्यवर नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिन हा आपल्या पक्षाच्या विचारांचा आणि संघर्षमय वाटचालीचा स्मरण दिन आहे.

bjp karyakarta samman

हा दिवस आपण केवळ साजरा करायचा नसून, पक्षासाठी कार्य करणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे योगदानही गौरवायचे आहे. त्यांच्या निष्ठा, समर्पण आणि परिश्रमामुळेच आज पक्षाची मुळे जनतेत घट्ट रुजलेली आहेत. उद्याचा सत्कार सोहळा हा केवळ एक औपचारिक कार्यक्रम नसून, आपल्या आदरभावनेचा एक नम्र प्रयत्न असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. या बैठकीला भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. bjp karyakarta samman

महाकाली मंदिर परिसरात होणार ५१ फूट ध्वजाचे ध्वजारोहण

चंद्रपूर – भारतीय जनता पार्टी चंद्रपूर विधानसभा व श्री महाकाली माता महोत्सव ट्रस्टच्या वतीने दिनांक रविवारी ६ एप्रिल २०२५ रोजी माता महाकाली मंदिर परिसरात १०१ माता महाकाली भक्तांच्या हस्ते ५१ फूट उंच ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात येणार आहे. या उत्सवामध्ये श्री महाकाली मातांची चांदीची मूर्ती, रथ व पालखीचे विधीवत पूजन होईल आणि भक्तांना दर्शन मिळणार आहे. सकाळी ८ वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!