Chandrapur breaking news । गडचांदूरमध्ये दोन तरुणांचे विषप्राशन? एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर!

Chandrapur breaking news

घटनेचा धक्कादायक उलगडा – दोन तरुण बेशुद्ध अवस्थेत सापडले

Chandrapur breaking news : गडचांदूर शहरातील सावित्रीबाई फुले महाविद्यालयाजवळ दोन तरुण बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याची घटना गुरुवारी समोर आली. या घटनेची माहिती मिळताच गडचांदूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत दोघांनाही गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. Gadchandur news today

चंद्रपूर जिल्ह्यात नरभक्षी वाघीण जेरबंद

उपचारादरम्यान प्रज्वल नवले (वय 21) या तरुणाचा मृत्यू झाला, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. तर दुसरा तरुण नागेश लांडगे बेशुद्ध अवस्थेत असल्याने त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दोघेही एकमेकांचे घनिष्ट मित्र असल्याचे समजते.

चंद्रपुरात मनसेला मोठा धक्का, ४ पदाधिकाऱ्यांवर खंडणीचे गुन्हे दाखल

या घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, प्राथमिक तपासात दोघांनी विष घेतल्याची माहिती पुढे येत आहे. गडचांदूर पोलीस पुढील तपास करत असून, नेमकी घटना घडली कशी याचा शोध सुरू आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!