Gondwana University Shivaji Maharaj statue । प्रा. निलेश बेलखेडे यांच्या प्रयत्नांना यश – गोंडवाना विद्यापीठात शिवरायांचा अश्वारूढ पुतळा मंजूर!

Gondwana University Shivaji Maharaj statue

Gondwana University Shivaji Maharaj statue : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली सिनेट सदस्य तथा युवासेना पूर्व विदर्भ सचिव प्रा. निलेश बेलखेडे यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या गडचिरोली येथील परिसरात तसेच चंद्रपूर येथे होऊ घातलेल्या विद्यापिठाच्या उपकेंद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करावा तसेच चंद्रपूर येथील गोंडवाना उपकेंद्राच्या परिसरास छत्रपती शिवाजी महाराज परिसर असे नाव द्यावे यासाठी ठराव पाठविला होता. University campus historical statues

चंद्रपुरात मद्य परवाना घोटाळ्याची चौकशी होणार

परंतु विद्यापीठ प्रशासनाने चुकीचे कारण देऊन हा प्रस्ताव नामंजूर केल्या गेला आहे त्यामुळळे आपण हा ठराव अधिसभेत मांडू शकत नाही संदर्भात पत्र पाठविले त्यामुळे निलेश बेलखेडे यांनी संपर्क करून आणि आपला प्रस्ताव आणि आपण पाठविलेले खारीज पत्र यामध्ये विसंगता असून पुन्हा एकदा वाचावा आणि मला प्रस्ताव मांडू द्यावा ही विनंती केली असता विद्यापीठ प्रशासनाने कुठलेही यावर उत्तर दिलें नाही.त्यामुळे निलेश बेलखेडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये कुलगुरू व प्रशासन हे महाराज विरोधात आहेत की काय असा प्रश्न उपस्थित केला होता व यापुढे ठराव न घेतल्यास आक्रमकपने भूमिका घेऊन शिवसेना च्या पद्धतीने आंदोलनाचा पवित्रा घेणार अशी भूमिका मांडली होती. Gondwana University latest updates

छत्रपती शिवाजी महाराज हे अखिल मानव जातीची प्रेरणा म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. व्यवस्थापन, नियोजन, पर्यावरण, मानवी मूल्य, युद्धनीती, राजनीति भाषा विकास कला विकास इत्यादी क्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रचंड मोठे कार्य असून आज देखील ते जगभरातील लोक अभ्यास करतात. महाराष्ट्रातील बहुतांश विद्यापिठात महाराजांचा पुतळा उभारला गेला असून अश्या छत्रपती शिवरायांची अखंड प्रेरणा गो़डवाना विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक ,कर्मचारी व इतर सर्वच घटकांना सातत्याने मिळत राहावे म्हणून गोंडवाना विद्यापीठाच्या गडचिरोली येथील परिसरात तसेच चंद्रपूर येथे होऊ घातलेल्या उपकेंद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करावा तसेच चंद्रपूर येथील गोंडवाना उपकेंद्राच्या परिसरास छत्रपती शिवाजी महाराज परिसर असे नाव देऊन आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव वाढवावा याकरिता हा ठराव मांडला होता. Shivaji Maharaj legacy in Maharashtra


यानंतर प्रा.बेलखेडे यांनी 24 मार्च 2025 च्या विद्यापीठ सिनेट च्या बैठकीमध्ये विद्यापीठ परिनियम कायदा अंतर्गत कामकाजादरम्यान सभागृहाचे नियम किंवा प्रथागत प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने लागू केल्या गेल्या आहेत किंवा दुर्लक्षित केल्या गेल्या आहेत याबद्दल पॉईंट ऑफ ऑर्डर घेऊन हा विषय मांडला असता कुलगुरू यांनी परवानगी दिली आणि अधिसभेमध्ये गडचिरोली विद्यापीठ अडपेली येथील मुख्य केंद्रआणि चंद्रपूर बाबुपेठ येथील उपकेंद्र येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळा उभारण्यात येईल हा प्रस्ताव सिनेट मध्ये सर्वानुमते मान्य करण्यात आला आणि उपकेंद्र परिसराला नाव देण्याचा संदर्भात प्रस्ताव राज्य सरकार कडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.


छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार या निर्णयामुळे संपूर्ण शिवप्रेमी,विद्यार्थी,युवक- युवतीनी आनंद व्यक्त करीत सर्व स्तरावरून युवासेना सचिव, सिनेट सदस्य प्रा. निलेश बेलखेडे यांचे आभार मानून अभिनंदन करत आहेत.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!