government construction sand price
government construction sand price : इरई नदीच्या पूर परिस्थितीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी नदीतील गाळ काढणे व नदीचे खोलीकरण हा प्रकल्प हाती घेण्यात येत आहे. त्या अनुषंगाने इरई नदीच्या खोलीकरणातून निघालेल्या वाळूचे दर शासकीय बांधकामाकरिता निश्चित करण्यात आले आहे. तर शेतकरी, घरकुल लाभार्थी यांना सदर वाळू निःशुल्क उपलब्ध करून देण्यात येईल, मात्र त्यासाठी वाहनाची सोय संबंधित लाभार्थ्यांनी करायची आहे. river dredging flood prevention
जिल्हास्तरीय वाळु सनियंत्रण समिती, चंद्रपूर यांचे 8 एप्रिल 2025 रोजीचे शासनाचे वाळू निर्गती धोरण व 3 एप्रिल 2025 रोजीच्या नदी नाले यामध्ये येणारे पुराचे नियोजन संबंधी शासन निर्णयामधील प्राप्त निर्देर्श तसेच 12 एप्रिल 2025 रोजी पालकमंत्री यांनी इरई नदीतील पूर परिस्थिती संदर्भात घेतलेल्या बैठकीतील चर्चा व सुचनेच्या अनुषंगाने, खोलीकरणाद्वारे निघालेला गाळ, माती, माती मिश्रीत वाळू , वाळूचे विनियोग करण्याबाबत पुढील प्रमाणे नियोजन करण्यात येत आहे. sand for housing project Maharashtra
शेतकरी, घरकूल लाभार्थी/ प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थी यांनी घरकूलासाठी पात्र असल्याचा पुरावा गट विकास अधिकारी मार्फत तहसीलदार कार्यालयाकडे सादर करुन स्व-खर्चाने वाहनाची सोय करून नि:शुल्क घेऊन जावा. तर शासकीय बांधकामा करीता पुरविण्यात येणाऱ्या वाळू करीता खालील प्रमाणे शुल्क भरणे आवश्यक राहील.
- अ) स्वामीत्वधन शुल्क – रुपये 600/- प्रती ब्रास (GRAS प्रणालीव्दारे)
- आ) जिल्हा खनिज प्रतिष्ठान शुल्क 10 % – रुपये 60/- प्रती ब्रास
- इ) TCS रक्कम 2 % – रुपये 12 /- प्रती ब्रास
- एकुण खर्च – रुपये 672 प्रती ब्रास एवढे रक्कम भरणे आवश्यक राहील, असे खनिकर्म विभागाने कळविले आहे.
विषय: वाळूचोरीमुळे महाराष्ट्र सरकारचे मागील वाळू धोरण ४ वर्षात 5000 कोटींचे नुकसान झाले आहे.
आमच्या गटातील 80% लोक प्रामाणिकपणे वाळू व्यवसाय करतात परंतु 20% माफिया मानसिकतेमुळे आम्ही बाजारात टिकू शकत नाही. व्यवस्था सुधारण्याची गरज आहे. काही मुद्दे मागणी आहे, वाळू चोरी 100% थांबवण्या साठी गरजेचे.
खालीलप्रमाणे वाळू प्रणाली मध्ये सुधारणा करण्यात यावी सरकारला विनंती
1. बाजारातील मागणी पूर्ण करता यावी यासाठी जास्तीस्त जास्त वाळू -घाट खुले करावेत. वाळूच्या कमतरतेमुळे महाग झाली आहे , चोरी वाढली आहे.
2. वाळू ब्रास रु. 2000 किंवा या पेक्षा कमी असावा, (सर्व खर्चासह) GST अतिरिक्त.
3. वाहन विना परवाना 5 लाख दंड, > दुसऱ्यांदा पकडले गेल्यास 5 लाख दंड व परमिट 1 वर्षासाठी रद्द करावे, मशीन मालक व वाळू-घाट ठेकेदार वर समान कारवाही करावी.
सोबत प्रशाशकीय अधिकारी ला पण निलंबित करणे.
4. DOMESTIC :गोर,गरीब ,मध्यम,वर्गीय जनतेसाठी आधार-नंबर वाळू-घाट सिस्टीम मध्ये थेट एन्ट्री केल्या नंतर LODING OTP त्यानंतर वाहन UNLODING OTP च्या वापर करून वाळू वाहन Trip चे जीवन चक्र बनेल व OTP, किल नाही केल्या नंतर पुढील परवाना सिस्टीम मध्ये होणार नाही ,(E-COMMERCE) पद्धत वापरावी.
A- १ आधार नंबर वर फक्त २० ब्रास वाळू सीमा असावी ,जास्त वाळू लागल्यास तहसील मधून, सीमा वाढवून घेण्याची तरतूद असावी
5. COMMERCIAL : RIVER SAND CODE जसे GOVERNMENT केंद्र किंवा राज्य शासन ची कामे ,CONTRACTOR ,BUILDER, HARDWEAR SHOP, PROCESS PLANT,RMC PLANT,TRADING, कोडनुसार वाहन भरणे व रिकामे केल्यानंतर, रॉयल्टीचा बारकोड स्कॅन करावा लागेल. यावरून, ट्रिपचा जीवन इतिहास प्रणालीमध्ये समाविष्ट केला जाईल.
A-वाळू खाली केल्या नंतर रॉयलटी चे बारकोड स्कॅन करून UNLODING ट्रिप एन्ड करणे.
B-UNLOAD बारकोड स्कॅन न केल्यास पुढील रॉयल्टी सिस्टीम मध्ये होता कामा नाही.
C-जीपीएस प्रणाली, ग्राहक कोड, अनलोड स्कॅन, TRIP जीवन चक्र उत्तम प्रकारे निरीक्षण करावे .
D- मुख्य जागेवर कॅमरा लावून निरीक्षण करून ONLINE दंड करणे.
6. रॉयल्टी प्रिंट/PDF फॉरमॅट वर ड्रायव्हर फोटो, वाहनाचा फोटो वाहन फ्रंट फोटो वाहन नंबर सह असावा.
A-कारण एका नंबर वर ४ वाहन चालवण्याचा प्रकार समोर आलेला आहे .
B-नंबर मिटवणे ,काळा ग्रीस ,माती लावून मिटवणे असले प्रकार समोर आले.
C-ड्राइवर अँप्लिकेश : हेवी VALID ड्राइवर लेसन्स व बाकी माहिती भरून sumbit करेल , वाहन चालवायला योग्य आहे कि नाही महाखनिज तर्फे रॉयलटी साठी पात्र करावे. ड्रायविंग लेसन्स नंबर सोबत जोडावे
D- या मध्ये रेकॉर्ड मध्ये ड्राइवर नि किती ट्रिप ,वाहन,ब्रास.लोकेशन,संपूर्ण माहिती महाखनिज मध्ये.
C-एक सूट देऊन दुसऱ्यांदा पकडल्यास ड्राइवर ला ब्लॉक करावेत ,वाळू ची वाहन चालवण्यास अपात्र करायला पाहिजे.
D- ड्राइवर पण वाळू ची वाहन चालवण्या साठी लालच प्रकारे पैसे घेतात.
E-ड्राइवर वाळू भरल्या नंतर ड्राइवर अँप्लिकेशन मध्ये ट्रिप टाइमर व लोकेशन चालू ऑटोमॅटिक प्रत्येक तासाला अलार्म बीप अलर्ट पण द्यावे ,ड्राईव्हवर जागरूक होणे फार गरजेचे आहे.
7. वाळू वाहनाला वेगळा पिवळा फ्रंट केबिन बेल्ट ओडख द्यावी .तामिळनाडू प्रमाणे
A- अवैध वाळू मध्ये वाहन अपघात झाल्यास अपघात झ्हालेल्या निर्दोष लोकांसाठी वाहन मालक व वाळू घाट मालक यांचावर वेगळी कारवाही करावी.
B- वाळू वाहन RTO ला फिटनेस RENIVAL हा ६ महिन्यात असावा .
8. शहरात येणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी, प्रवेशद्वारांवर मानवरहित स्कॅनर बसवून ऑनलाइन पंचनामा आणि चiलनाची तरतूद करावी.
A- वाळू- घाट GPS ट्रॅक करुण घाट बंद, आणि दंडात्मक कारवाईही झाली पाहिजे.
B- वाळू घाट मालकाची चौकशी करावी आणि GST आणि आयकर विभागाकडून कारवाई करावी.
C- ज्या ट्रक मालक आणि घाट मालकांनी एका वर्षात दोनदापेक्षा जास्त दंड भरला आहे, त्यांच्याकडे पैसे कुठून आले याचीही चौकशी झाली पाहिजे.