IDFC Bank Chandrapur Marathi language issue
IDFC Bank Chandrapur Marathi language issue : बॅकेचं कामकाज मराठीतच हवं ह्यासाठी रिझर्व्ह बॅकेचं पत्रक आधी बघून आपल्या बैंकेत मराठी भाषेतून कामकाज चालवा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा देतं चंद्रपूर मनसे पदाधिकारी यांनी आय.डी.एफ.सी बैंकेच्या व्यवस्थापककडे निवेदन देऊन दम दिला. Chandrapur MNS bank protest Marathi language

यावेळी बैंकेच्या कार्यालयात भिंतीवर असलेले इंग्रजीतील जाहिरात पत्रक काढून व बोर्डावरील इंग्रजी भाषेतील मजकूर खोदून मराठीत सर्व जाहिरात व फलक लावा असा आग्रह सुद्धा करण्यात आला यावेळी मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार, मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, जनहीत कक्ष विभाग जिल्हाध्यक्ष सुनील गुढे व इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. Chandrapur MNS warns banks over Marathi
७० रुपयांसाठी चंद्रपुरातील पेट्रोल पंपावर वाद
मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यात राज्यातील सर्व बैंकेतील कामकाज मराठीतून व्हावं यासाठी महाराष्ट्र सैनिकांनी प्रत्येक बैंकेत जाऊन प्रथम बैंक अधिकाऱ्यांना समज द्यावी असे सांगितले जर ते ऐकले नाही तर मनसे स्टाईल आंदोलन करून त्यांना समज द्यावी.

यांनतर चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा मनसे कामगार सेने जिल्हाध्यक्ष मन अन्देवार यांच्या नेतृत्वात विविध बँकेत जाऊन बँक अधिकाऱ्यांना कार्यालयात मराठी भाषेचा वापर करावा असे सांगत बँकेतील इंग्रजी शब्दातील फलक काढण्यात आले










