IPL gambling arrest
IPL gambling arrest : राजुरा (जिल्हा चंद्रपूर) – आयपीएल 2025 (IPL 2025) क्रिकेट स्पर्धेतील चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध लखनऊ सामन्यावर ऑनलाईन सट्टा लावताना राजुरा पोलिसांनी एकाला रंगेहाथ पकडले असून, एक आरोपी फरार आहे. सदर प्रकरणी राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. IPL betting news
ओव्हरटेक च्या प्रयत्नात भीषण अपघात, तरुण – तरुणीचा मृत्यू
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी, राजुरा नाका नंबर 3, स्टार बारसमोर सुझुकी स्कूटरवर बसून एक इसम आयफोनद्वारे ऑनलाईन बेटिंग करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी तत्काळ ठिकाणी धाड टाकून कारवाई केली.
अटक आरोपी:
- ऋग्देव निनाद येरने (वय 22), रा. आंबेडकर चौक, पेटवार्ड, राजुरा.
फरार आरोपी: - आशिष भैया, राहणार अज्ञात.
जप्त मुद्देमाल:
रोख रक्कम – ₹65,000/-
सुझुकी एक्सेस स्कूटर (क्र. MH34 CC 7682) – अंदाजे किंमत ₹60,000/-
आयफोन 13 प्रो मॅक्स मोबाईल – अंदाजे किंमत ₹60,000/-
- रोख रक्कम – ₹65,000/-
एकूण मुद्देमालाची किंमत: ₹1,85,000/-
पोलिसांनी नमूद आरोपींविरुद्ध गुन्हा क्रमांक 191/2025, कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा सहकलम 49, 112 भादंवि अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. अटक आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून, फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
कारवाई पथक:
या कारवाईत IPS अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोउपनि. भीष्मराज सोरते, पोउपनि. हाके, फौ. किशोर तुमराम, पो.हवा. विकी, पो.अं. शफीक शेख, पो.अं. महेश बोलगोडवार, पो.अं. शरद राठोड, पो.आ. आनंद मोरे व पो.आ. तिरुपती जाधव यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली.
राजुरा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या बेकायदेशीर सट्टा व्यवहारांपासून दूर राहावे, तसेच अशी माहिती मिळाल्यास तत्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.