kishor jorgewar land donation । “भाजप भवनासाठी एक एकर स्वतःची जमीन देणार – आमदार जोरगेवार यांची भावनिक घोषणा!”

kishor jorgewar land donation । “भाजप भवनासाठी एक एकर स्वतःची जमीन देणार – आमदार जोरगेवार यांची भावनिक घोषणा!”

kishor jorgewar land donation

kishor jorgewar land donation : जेव्हा पक्ष नव्हता, सत्ता नव्हती आणि संधीसुद्धा नव्हती, अशा काळात या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला. त्यांनी केवळ विचारांवर विश्वास ठेवून, रात्रंदिवस झटून पक्षाचे बीज रुजवले. त्यांच्या निष्ठा, समर्पण आणि निःस्वार्थ सेवेमुळेच आज भारतीय जनता पक्ष देशातील सर्वात मोठा पक्ष झाला आहे. आज पक्षाच्या स्थापना दिनी होत असलेला ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान केवळ औपचारिकता नाही, तर ही आपल्या अंतःकरणातील कृतज्ञतेचे खरे प्रतीक आहे असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त, भारतीय जनता पक्ष चंद्रपूर विधानसभा विभागाच्या वतीने श्री माता कन्यका सभागृहात ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पक्षाच्या शेकडो ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना आमदार जोरगेवार बोलत होते. BJP senior workers honor ceremony

Kishor jorgewar announcement

मराठीसाठी चंद्रपुरात मनसेचा रणसंग्राम

यावेळी राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर (hansraj ahir), भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शोभा फडणवीस, ज्येष्ठ नेते रमेशचंद्र बागला, विजय राऊत, माजी महानगराध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, प्रकाश देवतळे, अशोक जिवतोडे, अजय जयस्वाल, तुषार सोम, रघुवीर अहिर, मनोज पाल, राजेंद्र अडपेवार, माजी नगरसेवक देवानंद वाढई, माजी नगरसेविका वनिता डुकरे, वंदना हातगावकर, सविता दंढारे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

यानंतर बोलताना आ. जोरगेवार म्हणाले, पक्षासाठी निष्ठेने आणि समर्पण भावनेने काम करणाऱ्या आपल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान करण्याचा हा पवित्र प्रसंग आहे. या माध्यमातून पक्षाच्या वाटचालीत योगदान दिलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या आदरभावनेचा नम्र नमस्कार करण्याचा हा सोहळा आहे. भारतीय जनता पक्ष ही केवळ राजकीय संघटना नसून एक विचारधारा आहे. Political leaders honoring ceremony

राष्ट्रवाद, पारदर्शक प्रशासन, विकासाची निष्ठा आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा निर्धार, या विचारधारेचे बीज आपल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी पेरले, जपले आणि रुजवले. त्यांच्यामुळेच आज पक्ष देशात आणि राज्यात बळकटपणे उभा आहे. पक्षासाठी केवळ निवडणुकीत नव्हे, तर प्रत्येक संकटात, प्रत्येक लढ्यात खंबीरपणे उभे राहणारे हे ज्येष्ठ कार्यकर्ते आपल्यासाठी आदर्श आहेत. BJP foundation day celebrations

भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस हा संघर्ष, समर्पण आणि निष्ठेची आठवण करून देणारा दिवस आहे. आज आपण ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान करतो आहोत. ते केवळ कार्यकर्ते नसून पक्षाच्या मूळ पाया आहेत. त्यांनी पक्ष नसताना झेंडा घेतला, जनतेपर्यंत विचार पोहोचवले, अनेक वेळा संघर्ष केला. त्यांचे योगदान कधीही शब्दांत मावणारे नाही. सत्ता असो वा नसो, कार्यकर्त्यांनी पक्षासाठी खांद्याला खांदा लावून काम केले आहे. त्यांचा समर्पणभाव खरोखर वंदनीय आहे असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. Veteran BJP workers felicitation

यावेळी बोलताना राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी ज्येष्ठ कार्यकर्ते हे पक्षाची खरी ताकद आहेत. त्यांच्या त्यागातूनच हा पक्ष उभा राहिला आहे व पुढे जात आहे, असे सांगितले. तर ज्येष्ठ नेत्या शोभा फडणवीस यांनी आयोजनाचे कौतुक करताना जनसंघापासूनच कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. आणीबाणीच्या काळात कारागृह सोसले. हाच पक्ष जुन्या कार्यकर्त्यांच्या विचारांवर उभा राहिला आहे. हा पक्ष नेत्यांचा नसून कार्यकर्त्यांचा असल्याचे सांगितले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांना भोजनासाठी मानाच्या पंगतीत बसवून आदरभाव व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लाईव्ह संबोधन कार्यकर्त्यांना दाखवण्यात आले. पक्षाचा झेंडा लहरवून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. स्वर्गवासी कार्यकर्त्यांना यावेळी नमन करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्याम हेडाऊ यांनी केले. या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. BJP foundation day celebrations

पक्षाच्या भवनासाठी एक एकर जागा – आमदार किशोर जोरगेवार यांची घोषणा
भाषणात बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, शहरात पक्षाचे कार्यक्रम घेण्यासाठी स्वतःच्या हक्काचे भवन नाही, ही खंत आहे. त्यामुळे मी स्वतःच्या मालकीची एक एकर जागा भारतीय जनता पक्षाच्या भवनासाठी देण्याची घोषणा करतो. यामध्ये कार्यकर्त्यांच्या निवासाचीही सोय करू असे ते म्हणाले.

Sharing Is Caring:

Leave a Comment