Lighting for Ambedkar Jayanti
१४ एप्रिल रोजी बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती राष्ट्रीय सणाप्रमाणे साजरी व्हावी, यासाठी चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यांतील शासकीय इमारती रोशन करण्याची मागणी.
Lighting for Ambedkar Jayanti : दि. 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. सदर जयंती निमित्त चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील संपुर्ण शासकीय कार्यालयावर विद्युत रोशनाई करण्याची मागणी खासदार धानोरकर यांनी दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा जिल्हाधिकारी यांच्या कडे केली आहे. Ambedkar Jayanti in Chandrapur and Yavatmal
ज्याप्रमाणे राष्ट्रीय सणाच्या वेळी शासकीय कार्यालयावर विद्युत रोशनाई करण्यात येते त्याचप्रमाणे, 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील संपुर्ण शासकीय कार्यालयावर विद्युत रोशनाई करण्याची मागणी खासदार धानोरकर यांनी केली आहे.
संविधानाने दिलेल्या तत्वावर चालणार हा संपुर्ण देश दि. 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीने उजाळला जावा या हेतुने खासदार धानोरकर यांनी ही मागणी केली आहे. याकरीता खासदार धानोरकर यांनी चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांना याबाबत पत्रव्यवहार केला आहे.